आपला जिल्हा

कोपरगांव पिपल्स बँकेच्या अध्यक्षपदी रविंद्र रतनचंदजी ठोळे

कोपरगांव पिपल्स बँकेच्या अध्यक्षपदी रविंद्र रतनचंदजी ठोळे

कोपरगांव पिपल्स बँकेच्या अध्यक्षपदी रविंद्र रतनचंदजी ठोळे

जाहिरात

Kopargaon vijay kapse दि ७ जुलै २०२६कोपरगांव पिपल्स को-ऑप. बँकेच्या अध्यक्षपदी रविंद्र रतनचंदजी ठोळे यांची एकमताने निवड करण्यात आली. दि.०६.०७.२०२६ रोजी कोपरगांव येथील सहकार खात्याचे सहाय्यक निबंधक  संदिप रूद्राक्ष  यांच्या अध्यक्षते खाली झालेल्या सभेत वरील निवड करण्यात आली. चेअरमन पदा करीता एकच अर्ज आल्याने रविंद्र रतनचंदजी ठोळे यांची बिनविरोध निवड झाल्याचे  संदिपजी रूद्राक्ष यांनी जाहीर केले.

जाहिरात

अध्यक्ष रविंद्र रतनचंदजी ठोळे हे गेल्या १० वर्षापासुन बँकेच्या संचालक पदावर कार्यरत आहेत. बँकींग क्षेत्रातील अनुभवी व्यक्तीमत्व लाभल्यामुळे यापुढील काळातही त्यांच्या अनुभवाचा बँकेस निश्चित फायदा होईल असे गौरवोदगार मावळते चेअरमन सुनिल शांतीलालजी बंब यांनी काढले.

जाहिरात

तत्पूर्वी सुनिल शांतीलालजी बंब यांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीचा आढावा घेण्यात आला. बँकेचे सर्व संचालक मंडळ व कर्मचारी वर्ग यांना सोबत घेऊन बँकेच्या चेअरमनपदाची धुरा अत्यंत उत्तमरितीने पेलून बँकेची विश्वासार्हता अधिक बळकट करण्यात ते यशस्वी झाले. बँकेचे सभासद, ठेवीदार, कर्जदार, हितचिंतक यांचा त्यांच्यावरील विश्वास तसेच वेळोवेळी घेतलेले बँकेचे धोरणात्मक निर्णय यामुळे बँकेच्या प्रगतीत मोलाची भर पडली. सभासद, ठेवीदार, कर्जदार यांचे बरोबरच सेवकांचे प्रश्नही सोडविण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले.

बँकेचे नुतन चेअरमन यांनी यावेळी सांगितले की, बँकेच्या संचालकांनी जो माझ्यावर विश्वास दाखवुन चेअरमन पदाची जबाबदारी सोपविली आहे ती आम्ही सर्व संचालक मंडळ यशस्वीपणे पार पाडू व सध्याच्या स्पर्धेच्या काळात नवनवीन टेकनॉलॉजीचा वापर करून ग्राहक सेवा उत्तम देण्याचा प्रयत्न करण्यात येईल व बँकेच्या प्रगतीची यशस्वी घोडदौड कायम ठेवण्याचा प्रयत्न करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

यावेळी झालेल्या सभेत बँकेचे व्हा. चेअरमन  त्रिशला गंगवाल व सर्व संचालक कैलासचंद ठोळे, रविंद्र लोहाडे, धरमकुमार बागरेचा, कल्पेश शहा, अतुल काले, सत्येन मुंदडा, राजेंद्र शिंगी, सुनिल बोरा, दिपक पांडे, अनिल कंगले, हेमंत बोरावके, वसंतराव आव्हाड, भाऊसाहेब लोहकरे मुख्य कार्यकारी अधिकारी दिपक एकबोटे हे उपस्थित होते. संचालक अतुल काले यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले, नंतर सभेचे कामकाज संपल्याचे जाहीर केले.

जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे