आपला जिल्हा

शिवाबाबा वाघ प्रतिष्ठानचे राज्यस्तरीय साहित्य कलाकृती पुरस्कार जाहीर

शिवाबाबा वाघ प्रतिष्ठानचे राज्यस्तरीय साहित्य कलाकृती पुरस्कार जाहीर

शिवाबाबा वाघ प्रतिष्ठानचे राज्यस्तरीय साहित्य कलाकृती पुरस्कार जाहीर

जाहिरात

Kopargaon vijay kapse दि २२ मे २०२६ : तालुक्यातील पिंपळगाव जलाल येथील शिवाबाबा वाघ प्रतिष्ठान आयोजित शहादू शिवाजी वाघ स्मृती पाचव्या राज्यस्तरीय साहित्य कलाकृती पुरस्काराचे निकाल दि. ०१ मे २०२६ रोजी कामगार दिन व महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून निकाल जाहीर झाले असल्याचे प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय वाघ यांनी कळविले आहे.

जाहिरात

पिंपळगाव जलाल येथील शिवाबाबा वाघ प्रतिष्ठान आयोजित शहादू शिवाजी वाघ यांच्या स्मृतीदिनानिमित्त पाचव्या राज्यस्तरीय साहित्य कलाकृती पुरस्काराचे नियोजन करण्यात आले होते. महाराष्ट्रातून कविता संग्रह- १०३, कथा संग्रह-४१, कादंबरी -२२ आणि ललित लेखसंग्रह- २० अशा एकूण १८६ साहित्य कलाकृती पुरस्कारासाठी प्राप्त झाल्या होत्या. या कलाकृतीतून प्रत्येक साहित्य प्रकारातील कलाकृतीला खालीलप्रमाणे पुरस्कार जाहीर झालेले आहेत.

जाहिरात

कवितासंग्रहासाठी प्रथम क्रमांकाचा पुरस्कार : नांदगाव जि नाशिक येथील कवयित्री प्रतिभा सुरेश खैरनार यांच्या “वंशावळीच्या प्राचीन सरीतून” तर व्दितीय क्रमांक पुरस्कार धुळ्याचे कवी अरविंदा भामरे यांच्या शापित कोलाहलाच्या नोंदी या कलाकृतीसाठी

जाहिरात

कथासंग्रहासाठी प्रथम क्रमांकाचा पुरस्कार राहुरी जि अहिल्यानगर येथील लेखक सयाजी शिंदे यांच्या “चरैवेति, तर व्दितीय क्रमांक सोलापूर येथील लेखिका संध्या धर्माधिकारी यांच्या बेरं या कलाकृतीसाठी

मा. प्रतिभा सुरेश खैरनार- नांदगाव, – वंशावळीच्या प्राचीन सरीतून… कवितासंग्रह – प्रथम क्रमांक

कादंबरीसाठी प्रथम क्रमांकाचा पुरस्कार कडेगाव जि. सांगली येथील लेखक राजेश चौरे यांच्या “जिद्द पेरतांना” तर व्दितीय क्रमांक पारनेर जि अहिल्यानगर येथील अशोक पवार यांच्या …आणि रामा कलेक्टर झाला या कलाकृतीसाठी

मा. राजेश चांगदेव चौरे – चांदा, जि. अहिल्यानगर – जिद्द पेरतांना – कादंबरी प्रथम क्रमांक

ललित लेखसंग्रहासाठी प्रथम क्रमांकाचा पुरस्कार फलटण जि सातारा येथील लेखक मा डॉ अशोक शिंदे यांच्या गाव पांढरीच्या वैभवखुणा तर व्दितीय क्रमांक अमरावती येथील अरुणा सबाने यांच्या उमेद जगण्याची या कलाकृतीसाठी पुरस्कार जाहीर झाला आहे.

मा. सयाजी शिंदे – राहुरी जि अहिल्यानगर – चरैवेती – कथासंग्रह – प्रथम क्रमांक

वरील प्रमाणे पुरस्कार जाहीर झाले असून या सर्व कलाकृती पुरस्कार निवडीसाठी परिक्षक अनुक्रमे कवितासंग्रहासाठी प्रा. अमोल चिने, कोपरगाव (अहिल्यानगर), कथासंग्रहासाठी डॉ प्रकाश कारभारी शेवाळे (नाशिक), कादंबरीसाठी मा. प्रा. डॉ. आर.जे. इंगोले, चांदवड (नाशिक) तर ललित लेखसंग्रहासाठी मा राम गायकवाड, कोपरगाव (अहिल्यानगर) यांनी परीक्षण केले. परिक्षकांनी दिलेल्या निर्णयाचे स्वागत करून प्रतिष्ठानने पुरस्कारार्थीचे अभिनंदन केले आहे.
पुरस्कार प्राप्त सर्व कलाकृतींचा सन्मान दि. ४ जून २०२६ रोजी पिंपळगाव जलाल येथे होणाऱ्या राज्यस्तरीय साहित्य कलाकृती पुरस्कार प्रदान सोहळ्यात होणार असल्याचे अध्यक्ष संजय वाघ यांनी कळविले आहे.

मा. डॉ अशोक शिंदे, फलटण , जि सातारा – गाव पांढरीच्या वैभवखुणा – ललित लेखसंग्रह – प्रथम क्रमांक
मा. अरविंदा राजधर भामरे, धुळे – शापित कोलाहलाच्या नोंदी – काव्यसंग्रह – व्दितीय क्रमांक
मा. अशोक किसन पवार – पारनेर, जि अहिल्यानगर – .आणि रामा कलेक्टर झाला – कादंबरी – व्दितीय क्रमांक
मा संध्या सूर्यकांत धर्माधिकारी – सोलापूर, – बेरं – कथासंग्रह – व्दितीय क्रमांक
मा. अरुणा साबने – अमरावती – उमेद जगण्याची – ललित लेखसंग्रह – व्दितीय क्रमांक

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे