आपला जिल्हा

बिपीनदादा कोल्हेंच्या वाढदिवसानिमीत्त संजीवनी कार्यस्थळावर स्वच्छता मोहिम व वृक्षारोपण

बिपीनदादा कोल्हेंच्या वाढदिवसानिमीत्त संजीवनी कार्यस्थळावर स्वच्छता मोहिम व वृक्षारोपण
बिपीनदादा कोल्हेंच्या वाढदिवसानिमीत्त संजीवनी कार्यस्थळावर स्वच्छता मोहिम व वृक्षारोपण
जाहिरात

Kopargaon vijay kapse दि २१ जुन २०२६बदलत्या पर्यावरणीय स्थितीत दिवसेंदिवस तपमानात मोठी वाढ होवु लागली आहे परिणामी पर्जन्यमानात घट होत आहे तेंव्हा अशा परिस्थितीत प्रत्येकांने वृक्षारोपण करून झाडे जगविण्यांवर भर द्यावा असे प्रतिपादन सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर परजणे यांनी केले.

जाहिरात
          संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर स्वच्छता अभियान व वृक्षारोपण मोहिम हाती घेण्यांत आली त्याचे उदघाटन करतांना ते बोलत होते. प्रारंभी माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यांत आले. प्रभारी कार्यकारी संचालक तुळशीराम कानवडे यांनी बिपीनदादा कोल्हे यांच्या सामाजिक कार्याची माहिती दिली. कामगार नेते मनोहर शिंदे, साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे, एच. आर. मॅनेजर विशाल वाजपेयी यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

जाहिरात
           श्री. ज्ञानेश्वर परजणे पुढे म्हणाले की, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या सामाजिक कार्याचा आलेख मोठा आहे, वृक्ष लावुन ते जोपासण्यावर त्यांचा सतत भर असतो, परमेश्वर त्यांना दिर्घायुष्य देवो. कारखाना अंतर्गत विविध विभागाची यावेळी साफ-सफाई करण्यांत आली.
          याप्रसंगी संचालक सर्वश्री. निलेश देवकर, पांडुरंगशास्त्री शिंदे, ज्ञानेश्वर होन, बापूसाहेब बारहाते, विलासराव वाबळे, मोहनराव वाबळे, रमेश घोडेराव, सीओओ शिवाकुमार, तांत्रीक सल्लागार सिमांचल पांडा, व्यवस्थापकीय व्यवस्थापक प्रकाश डुंबरे, अमृत संजीवनीचे अमोल चांदोरे, संभाजी आहेर, उपमुख्य लेखापाल प्रविण टेमगर, मुख्य शेतकी अधिकारी नारायण चौधरी, मुख्य अभियंता महंतेश तोडकर, जनसंपर्क अधिकारी रंगनाथ लोंढे, कामगार कल्याण अधिकारी एस सी. चिने, भास्करराव बेलोटे, सुरक्षा अधिकारी रमेश डांगे, स्वीय सहाय्यक आयुब पठाण, स्थापत्य अभियंता एस. एन. निकम, श्री. साबळे, राजेंद्र पाबळे, सेफटी ऑफिसर सलमान शेख,  मतीन सर, बायोगॅस विभाग प्रमुख उदय पवार, आरोग्य खात्याचे प्रविण गिरमे, खातेप्रमुख, उपखातेप्रमुख, कामगार, विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. शेवटी एच. आर. मॅनेजर विशाल वाजपेयी यांनी आभार मानले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे