आपला जिल्हा

श्री.क्षेत्र खंडोबा देवस्थान, खळी व श्री.क्षेत्र विठोबा देव मंदिर, धांदरफळ बु. यांना “क” वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा

श्री.क्षेत्र खंडोबा देवस्थान, खळी व श्री.क्षेत्र विठोबा देव मंदिर, धांदरफळ बु. यांना “क” वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा

आमदार सत्यजीत तांबे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश – ग्रामस्थांमध्ये समाधान

जाहिरात

संगमनेर विजय कापसे दि २५ जानेवारी २०२६ अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार सत्यजीत तांबे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे संगमनेर तालुक्यातील श्री.क्षेत्र खंडोबा देवस्थान, खळी व श्री. क्षेत्र विठोबा देव मंदिर, धंदारफळ बु. या दोन महत्त्वाच्या देवस्थानांना शासनाकडून “क” वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मंजूर करण्यात आला आहे. या निर्णयामुळे तालुका व परिसरातील धार्मिक पर्यटनाला चालना मिळणार आहे.

जाहिरात

“क” वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाल्यानंतर शासनाच्या विविध योजनांतर्गत जिल्हा नियोजन समितीमार्फत तसेच तीर्थक्षेत्र विकास योजनेतून निधी उपलब्ध होतो. या निधीतून देवस्थान परिसरात भाविकांसाठी स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, अंतर्गत रस्ते, विद्युत व प्रकाश व्यवस्था, सभामंडप, भक्तनिवास, सुशोभीकरण व सुरक्षिततेच्या सुविधा उभारणे शक्य होणार आहे. याची दखल घेऊन क वर्गाच्या तीर्थक्षेत्र दर्जा ला मंजुरी दिल्याबद्दल आमदार सत्यजीत तांबे यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांचे विशेष आभार मानले.

जाहिरात

या निर्णयामुळे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय दूर होणार असून स्थानिक नागरिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. तसेच ग्रामविकासाला व स्थानिक अर्थकारणाला सकारात्मक चालना मिळणार आहे. या दोन्ही देवस्थानांना “क” वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा यासाठी सातत्याने पाठपुरावा केल्याबद्दल तालुक्यातील तसेच धांदरफळ गावातील व परिसरातील भाविकांनी तसेच यात्रा कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार सत्यजीत तांबे यांचे आभार मानले आहेत.

लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी संगमनेर तालुक्यातील प्रत्येक गावात महत्त्वपूर्ण योजना राबवल्या.
श्री क्षेत्र खंडोबा आणि श्री क्षेत्र विठोबा धांदरफळ हे संगमनेर तालुक्यातील एक महत्त्वाचे देवस्थानाचे ठिकाण आहे.
या तीर्थक्षेत्राला ‘क’ वर्ग दर्जा मिळाल्यामुळे देवस्थान पर्यटनाला चालना मिळेल.
आमदार सत्यजीत तांबे

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे