आपला जिल्हा

युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या उपस्थितीत प्रजासत्ताक दिनी अद्यावत रोड स्वीपर मशीनचे लोकार्पण 

युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या उपस्थितीत प्रजासत्ताक दिनी अद्यावत रोड स्वीपर मशीनचे लोकार्पण 
विश्वासनामा पूर्ततेकडे वाटचाल,” कोल्हे हैं तो मुमकीन हैं ” अशी सर्वत्र चर्चा
जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि २६ जानेवारी २०२६नगरपरिषद निवडणुकीदरम्यान कोपरगावकरांना दिलेल्या विश्वासनाम्यातील आश्वासने पूर्ण करण्याकडे कोपरगाव नगरपरिषदेने पाऊल टाकले आहे. नुकतेच कोपरगाव नगरपरिषदेच्या अधिपत्याखाली शहरातील नागरिकांच्या स्वच्छतेच्या समस्या मार्गी लागाव्यात, या हेतूने महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. पालिके. धूळ कमी व्हावी तसेच शहराची योग्य प्रकारे निगा राखली जावी व वेळोवेळी स्वच्छता व्हावी, या उद्देशाने अत्याधुनिक स्वीपर मशीनरीच्या सहाय्याने रस्ता स्वच्छता करण्यास कोपरगाव नगरपरिषदेने प्रथम प्राधान्य दिले आहे.शहरातील नागरिकांच्या स्वच्छतेच्या समस्या वेळेत सुटाव्यात, तसेच ‘माझे कोपरगाव,स्वच्छ कोपरगाव’ ही ध्येयपूर्ती साध्य करण्यासाठी भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने या अद्यावत स्वीपर मशीनरीचे लोकार्पण करण्यात आले असल्याची भावना युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांनी व्यक्त केली.

जाहिरात
भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित या उद्घाटनास युवानेते विवेकभैय्या कोल्हे, नगराध्यक्ष पराग संधान, उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर,आरोग्य सभापती वैभव आढाव तसेच नगरसेवक, नगरसेविका व नगरपरिषदेचे कर्मचारी,पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात
यावेळी युवानेते विवेक कोल्हे यांनी विश्वासनाम्यात दिलेला शब्द पूर्ण करण्यात आल्याची भावना व्यक्त केली.ते पुढे म्हणाले की, कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीमध्ये जनतेने भाजप मित्र पक्षाला दिलेला कौल हा मोठ्या विश्वासाने दिलेला आहे. या निवडणुकीत आम्ही कोपरगाव शहरातील नागरिकांना केवळ विश्वास नाही, तर दिलेला विश्वासनामा पूर्ण करून देण्याचा संदेश दिला होता. त्या संदेशाला अनुसरून आज भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त स्वच्छतेच्या गरजा लक्षात घेऊन अत्याधुनिक व सुसज्ज अशा रोड स्वीपर मशीनचे लोकार्पण नगरपरिषदेच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
आता कोपरगाव शहराची स्वच्छता वेळेवर होणार असून, याचा लाभ शहरवासीयांना चांगल्या पद्धतीने होणार आहे. शहरामध्ये कुठेही घाण किंवा कचरा साचल्यास नागरिकांनी तात्काळ नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांना माहिती द्यावी. संबंधित कर्मचाऱ्यांना माहिती मिळाल्यानंतर तात्काळ त्या ठिकाणी रोड स्वीपर मशीनद्वारे स्वच्छता मोहीम राबवण्यात येईल. भविष्यात कोपरगाव शहराची एक दर्जेदार आणि स्वच्छ शहर म्हणून होईल या साठी प्रयत्न सामुहिकरीत्या करणे गरजेचे आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य व जीवनमान उंचावेल, असे त्यांनी नमूद केले.यावेळी विवेकभैय्या कोल्हे यांनी कोपरगाव शहरातील व मतदारसंघातील समस्त नागरिकांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
मुख्य रस्त्यावर या मशिनीची चाचणी घेण्यात आली असून उद्घाटन प्रसंगी बाजारपेठेत नागरिकांनी व व्यापारी वर्गाने या निर्णयाचे स्वागत केले असून मोठ्या प्रमाणात दिलासा या स्विपर मशिनच्या माध्यमातून मिळणार आहे अशी प्रतिक्रिया सर्वत्र व्यक्त करण्यात येत होती.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे