आपला जिल्हा

के. जे. सोमैया महाविद्यालयात विद्यार्थी सहभाग परिसंवादाचे आयोजन

के. जे. सोमैया महाविद्यालयात विद्यार्थी सहभाग परिसंवादाचे आयोजन

के. जे. सोमैया महाविद्यालयात विद्यार्थी सहभाग परिसंवादाचे आयोजन

जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि ५ फेब्रुवारी २०२६के.जे.सोमैया (वरिष्ठ) व के.बी. रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालय येथे येत्या 9 फेब्रुवारी 2026 रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ गुणवत्ता सुधार योजनेंतर्गत   विद्यार्थी सहभाग परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. विजय ठाणगे यांनी येथे दिली.

जाहिरात

ते पुढे  म्हणाले की, महाविद्यालयीन विद्यार्थ्यानी प्राप्त केलेल्या ज्ञानाच्या आधारावर विविध विषयांवर त्यांचे विचार आणि कल्पना विस्तृतपणे मांडण्याचे कौशल्य या परिसंवादातून आत्मसात होणार आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या उद्देशाने आयोजित या परिसंवादासाठी शाश्वत विकास, युवती सुरक्षेमध्ये माझी भूमिका, विकसित भारत माझे स्वप्न माझा आराखडा, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणआणि मी असे विषय ठेवण्यात आलेले आहेत. या परिसंवादात महाविद्यालयातील अधिक विद्यार्थ्यानी सहभागी व्हावे असे आवाहन संयोजक डॉ. निता शिंदे यांनी केले आहे.

जाहिरात
जाहिरात

 

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे