आपला जिल्हा

सुधाकरराव जोशी यांना आयकॉनिक लिडर पुरस्कार प्रदान; चार राज्यातील बँकिंग नामांकनातुन झाली निवड

सुधाकरराव जोशी यांना आयकॉनिक लिडर पुरस्कार प्रदान; चार राज्यातील बँकिंग नामांकनातुन झाली निवड
सुधाकरराव जोशी यांना आयकॉनिक लिडर पुरस्कार प्रदान; चार राज्यातील बँकिंग नामांकनातुन झाली निवड
संगमनेर विजय कापसे दि ५ फेब्रुवारी २०२६लोकनेते माजी महसुलमंत्री बाळासाहेब थोरात साहेब यांचे मार्गदर्शनखाली कार्यरत असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील बँकिंग क्षेत्रातील अग्रगण्य सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँकेचे चेअरमन सुधाकरराव माधवराव जोशी यांना को ऑपरेटिव्ह बँक्स टॉप १०० सीएक्सओ यांचे वतीने व्यावसायिक नेतृत्वक्षमता चेअरमन स्पेशल उत्कृष्ट आयकॉनिक लिडर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

जाहिरात
सदर पुरस्कारासाठी महाराष्ट्र, तेलंगणा, गुजरात व कर्नाटक राज्यातून सुमारे १४० सहकारी बँकामधील नामांकनाचे प्रस्ताव मागविण्यात आले होते. यामध्ये सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँकेचे चेअरमन सुधाकरराव माधवराव जोशी यांना बँकिंग व्यवहारातील टायर दोन वर्गवारीत हा पुरस्कार देणेत आला.

जाहिरात

एकात्मिक व्यवसाय सेवा आयबीए उपाध्यक्ष श्री.गोपाल, भारतीय रिझर्व्ह बँकेचे संचालक विजय मराठे व महाराष्ट्र फेडरेशनचे अध्यक्ष अजय ब्रम्हेचा आदी मान्यवरांचे हस्ते सदर पुरस्कार इमॅजिका खोपोली येथे सन्मानपुर्वक प्रदान करणेत आला. याप्रसंगी बँकेचे उपाध्यक्ष अॅड. नानासाहेब शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी सुशिल गुजराथी उपस्थित होते.

जाहिरात

लोकनेते माजी महसुलमंत्री बाळासाहेब थोरात साहेब यांचे मार्गदर्शनखाली सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँकेचे चेअरमन सुधाकरराव जोशी यांनी बँकेच्या सर्वागिन प्रगतीसाठी विशेष लक्ष दिले. त्यामुळे बँकेचे ठेवी व कर्ज यात चांगली वाढ झाली. आजमितीस बँकेचा एकुण व्यवसाय ११५० कोटी पेक्षा अधिक झाला आहे. डिजिटल बैंकिंग प्रणाली विकसित करून सदर प्रणाली त्यांनी यशस्वी केली. याकामी त्यांना संचालक मंडळ व कर्मचारी यांचे सहकार्य मिळाले.

जाहिरात

या पुरस्काराबद्दल लोकनेते माजी महसुलमंत्री बाळासाहेब थोरात, जयहिंद लोकचळवळचे संस्थापक मा.आ.डॉ.सुधीर तांबे, नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे, सौ. दुर्गाताई तांबे,नगराध्यक्ष डॉ.मैथिली तांबे, युवक कॉंग्रेसच्या अध्यक्षा डॉ.जयश्रीताई थोरात, इंद्रजित भाऊ थोरात, राजहंसचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख, पांडुरंग घुले, ॲड.नानासाहेब शिंदे,संपतराव डोंगरे, डॉ.हर्षल तांबे, दशरथ वर्षे, विष्णुपंत रहाटळ यासह अमृतवाहिनी बँकेच्या सर्व संचालक, सभासद व विविध मान्यवरांनी अभिनंदन केले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे