सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून प्रा. नारायण खेमनर यांना पीएच.डी. प्रदान

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून प्रा. नारायण खेमनर यांना पीएच.डी. प्रदान
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून प्रा. नारायण खेमनर यांना पीएच.डी. प्रदान

Sangmner vijay kapse दि १३ मे २०२६-: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांनी “Experimental Investigation into Dissimilar Metal Lap Joining Using Friction Stir Scribe Technique” या विषयावर संशोधन पूर्ण केल्याबद्दल डॉ. प्रा. नारायण सहादू खेमनर यांना पीएच.डी. पदवी प्रदान केली. हे संशोधन डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, अहिल्यानगर येथील यांत्रिकी अभियांत्रिकी विभागातील संशोधन केंद्रात करण्यात आले असून, या संशोधनासाठी त्यांना डॉ. विजय गडाख यांचे मार्गदर्शन लाभले.

डॉ. प्रा. नारायण खेमनर हे संगमनेर तालुक्यातील अंभोरे गावचे माजी सरपंच सहादू खेमनर यांचे सुपुत्र असून ते सध्या सहाय्यक प्राध्यापक म्हणून अमृतवाहिनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, संगमनेर येथे कार्यरत आहेत. त्यांच्या संशोधनामुळे ऑटोमोबाईल उद्योगामध्ये धातूंच्या जोडणीच्या आधुनिक तंत्रज्ञानाला चालना मिळून वाहनांचे वजन कमी करण्यास तसेच मायलेज वाढविण्यास मोठी मदत होणार आहे.

या संशोधनाच्या माध्यमातून त्यांनी २ एससीआय दर्जाचे जर्नल पेपर्स, २ आंतरराष्ट्रीय परिषदेतील संशोधन पेपर्स सादर केली आहेत. त्यांच्या या यशाबद्दल बाळासाहेब भाऊसाहेब थोरात ( अध्यक्ष, अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्था व माजी महसूल मंत्री, महाराष्ट्र शासन ), मा. आ. सुधीर तांबे , आ. सत्यजित तांबे , रणजितसिंह देशमुख , चेअरमन, राजहंस दूध संघ , विश्वस्त शरयू देशमुख , ए. बी. शिंदे ( मुख्य कार्यकारी अधिकारी ) अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्था , प्रा. व्ही. बी. धुमाळ , मॅनेजर , डॉ. प्रा. जे. बी. गुरव ( संचालक, अकॅडेमिक्स ), तसेच प्राचार्य डॉ. एम. ए. वेंकटेश , अमृतवाहिनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग , प्रा. व्ही. पी. वाघे , रजिस्ट्रार तसेच डॉ. प्रा. आर. आर. नवथर ( प्राचार्य, डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, अहिल्यानगर ), डॉ. प्रा. एस. एम. मगर ( विभागप्रमुख ), डॉ. प्रा. के. एम. मरकड ( समन्वयक ) व त्यांचे सर्व मित्र परिवार , यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

पीएच.डी. पदवी मिळाल्यामुळे खेमनर यांच्या शैक्षणिक आणि संशोधन क्षेत्रातील योगदानाची दखल घेतली जात असून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.



