भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत विकासकामांना मंजुरी : आ. विवेक कोल्हे
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत विकासकामांना मंजुरी : आ. विवेक कोल्हे
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत विकासकामांना मंजुरी : आ. विवेक कोल्हे

Kopargaon vijay kapse दि २४ जुलै २०२६- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध विकासकामांना शासनाने मंजुरी दिली आहे. जिल्ह्यासाठी एकूण २ कोटी ३८ लाख रुपयांच्या विकासकामांना मान्यता मिळाली असून, याबद्दल आमदार विवेक कोल्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महायुती सरकारचे आभार मानले आहेत.

या मंजूर कामांमध्ये कोपरगाव तालुक्यातील अनेक महत्त्वाच्या विकासकामांचा समावेश आहे. धामोरी येथे संविधान भवन उभारण्यासाठी ३० लाख रुपये मंजूर करण्यात आले असून, पहिल्या टप्प्यात ९ लाख रुपये (३० टक्के निधी) वितरित करण्यात येणार आहेत.
याशिवाय कोपरगाव नगरपरिषद हद्दीत संत रोहिदास भवन उभारण्यासाठी २५ लाख रुपये, जेऊर कुंभारी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरात संरक्षक भिंत व सुशोभीकरणासाठी १० लाख रुपये, कोळगावथडी येथे समाज मंदिरासाठी १५ लाख रुपये, काकडी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सुशोभीकरणासाठी १५ लाख रुपये तसेच करंजी येथे संत रविदास महाराज सभा मंडपासाठी १५ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

याबाबत आमदार विवेक कोल्हे म्हणाले की, सामाजिक न्यायाची भावना अधिक बळकट करण्यासाठी तसेच समाजातील वंचित घटकांच्या विकासाला गती देण्यासाठी महायुती सरकार सातत्याने सकारात्मक निर्णय घेत आहे. सामाजिक पायाभूत सुविधा उभारण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देत शासनाने विकासाला प्राधान्य दिले आहे. या मंजुरीमुळे संबंधित गावांतील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, मंजूर झालेली सर्व विकासकामे लवकरात लवकर पूर्ण व्हावीत यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जाईल, असेही आमदार विवेक कोल्हे यांनी सांगितले.



