संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाची धडाकेबाज कामगिरी

संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाची धडाकेबाज कामगिरी
टेट्रा पॅक कंपनीमध्ये २० विद्यार्थ्यांची आकर्षक पॅकेजवर नोकरीसाठी निवड

कोपरगाव विजय कापसे दि ६ फेब्रुवारी २०२६– संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या वीस विद्यार्थ्यांना ट्रेटा पॅक या बहुराष्ट्रीय कंपनीने आकर्षक वेतन देऊ करून नोकरीची संधी दिली. ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या नियोजनबध्द प्रयत्नाचे हे फलीत आहे. या विभागाच्या माध्यमातून दिल्या जाणा-या उद्योगाभिमुख प्रशिक्षणामुळे हे शक्य झाले. या विद्यार्थ्यांत बी.टेक. अंतिम वर्षातील मेकॅनिकल इंजिनिअरींगच्या पंधरा, इलेक्ट्रिकल इंजिनिअरींगच्या तिन आणि मेकॅट्रॉनिक्स इंजिनिअरींगच्या दोन विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

त्यांची नावे पुढील प्रमाणे, मेकॅनिकल इंजिनिअरींगच्या सानिका प्रदिप भागवत, आकाश बापू दावभाट, वैष्णवी शीतल गिरी, साहिल अशोक गोरे, सत्यम दत्तात्रय जाधव, शताक्षी सुनिल कलसाईत, श्रुती राजेंद्र कोरके, साक्षी बाबासाहेब म्हस्के, ऋषिकेश विलास पानगव्हाणे, साक्षी नारायण पवार, आकांक्षा सुनिल वैराळ, श्रध्दा विजय भवर, कृष्णा ज्ञानेश्वर माळी, भक्ती भाऊसाहेब तर्डे, हर्षल धोंडीबा गागरे, इलेक्ट्रिकल इंजिनिअरींगच्या कल्याणी दिलीप काकड, शिवानी राजु काकडे, चंचल संतोष जाधव व मेकॅट्रॉनिक्स इंजिनिअरींगच्या श्रध्दा विला औताडे आणि साक्षी साहेबराव जाधव.

संजीवनीचे अध्यक्ष नितिनदादा कोल्हे यांनी सर्व निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे अभिनंदन करून विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यकारी विश्वस्त अमित कोल्हे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. आर.ए. कापगते, डॉ. एम.व्ही. नागरहल्ली, डॉ. विशाल तिडके, डॉ. प्रसाद पटारे तसेच तिनही विभागांचे प्लेसमेंट समन्वयक उपस्थित होते. यावेळी बोलताना कार्यकारी विश्वस्त अमित कोल्हे म्हणाले, नोकरीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये मुलींची संख्या लक्षणिय आहे. ही संस्थेच्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे. संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या समान संधी व सक्षम प्रशिक्षण या धोरणाचे हे प्रतिबिंब आहे. संजीवनीच्या गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि उद्योगाभिमुख मार्गदर्शनामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी स्वयंपूर्ण होत आहेत. त्यांना जागतिक दर्जाच्या कंपन्यांमध्ये चांगल्या पगाराच्या नोकरीच्या संधी मिळत आहेत.

संजीवनी इंजिनिअरींग काॅलेजच्या एकाच वेळी वीस विद्यार्थ्यांना टेट्रा पॅक या बहुराष्ट्रीय कंपनीने नोकरीची संधी दिली. या सर्वांना आकर्षक वेतन देऊ केले. ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाचा उद्योग जगता सोबत उत्तम संपर्क आहे. उद्योगांना पुरक ठरतील अशा दृष्टीने अभ्यासक्रमात आणि प्रशिक्षणात बदल केले आहेत. यामुळे संजीवनीच्या विद्यार्थ्यांचे भवितव्य उज्वल होते आहे.
अमित कोल्हे(कार्यकारी विश्वस्त, संजीवनी शैक्षणीक संकुल)



