आपला जिल्हा

अमृतवाहिनी १४ फेब्रुवारी रोजी एच आर कॉन्क्लेव्ह चे आयोजन

अमृतवाहिनी १४ फेब्रुवारी रोजी एच आर कॉन्क्लेव्ह चे आयोजन

विविध कंपन्यांच्या समन्वयातून विद्यार्थ्यांना मोठी संधी

जाहिरात

संगमनेर विजय कापसे दि १२ फेब्रुवारी २०२६माजी शिक्षण मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली गुणवत्तेतून आक्रमणांची ठरलेल्या अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयात शनिवारी विविध कंपन्या व महाविद्यालय यामध्ये समन्वय घडवण्याबरोबर विद्यार्थ्यांना नोकरीची मोठी संधी निर्माण व्हावी यासाठी विविध राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कंपन्यांमधील एचआर (मानव संसाधन अधिकारी) यांचे कॉन्क्लेव्ह आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्राचार्य डॉ एम.ए व्यंकटेश यांनी दिली आहे.

जाहिरात

याबाबत अधिक माहिती देताना डॉ. व्यंकटेश म्हणाले की शनिवार दिनांक 14 फेब्रुवारी 2020 रोजी या कोन्क्लेव्ह शिबिराचे उद्घाटन माजी शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात, व माजी आमदार डॉ सुधीर तांबे, संस्थेच्या कार्यकारी विश्वस्त सौ शरयूताई देशमुख यांच्या उपस्थितीत होणार असून या कार्यक्रमासाठी स्टुपिड टेक्नॉलॉजी या संस्थेच्या संस्थापक दीप्ती अग्रवाल उपस्थित राहणार आहेत याचबरोबर एल अँड टी टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस चे जनरल मॅनेजर डॉ पी बी कोटूर हे उपस्थित राहणार आहेत. या एक दिवसीय एच आर मधून विविध उद्योग क्षेत्रातील ह्युमन रिसर्च मॅनेजर, तज्ञ आणि इंजिनिअरिंग कॉलेजमधील शिक्षक यांना निमंत्रित करण्यात आले आहे या माध्यमातून सध्याच्या उद्योग व्यवसायामधील मनुष्यबळाच्या गरजा आवश्यक कौशल्य भरती प्रक्रिया तसेच अभ्यासक्रमाविषयी उद्योगाभिमुख मार्गदर्शन केले जाणार आहे.

जाहिरात

याचबरोबर या एक दिवसीय शिबिरातून उद्योग शिक्षण संस्था परस्पर संवाद अधिक प्रभावी करण्याच्या दृष्टीने विविध चर्चासत्रांचे आयोजित करण्यात आले आहे पहिल्या पॅनेल चर्चेत जनरेटिव्ह एआय टॅलेंट ऐकायझेशन प्रक्रियेत होत असलेले बदल तसेच विद्यार्थ्यांनी विकसित करावयाची कौशल्य व मानसिकता या विषयावर सखोल चर्चा करण्यात येणार आहे या चर्चासत्राचे समन्वय अमिटी विद्यापीठ बेंगलोर येथील डॉ तुषार सोमनाथ  हे करणार आहेत. तर दुसऱ्या पॅनल मध्ये उद्योग सज्ज व चपळ मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी कौशल्यातील दरी भरून काढण्यासाठी डॉ वृषाली साबळे मार्गदर्शन करणार आहेत.

जाहिरात

याचबरोबर डॉक्टर व्हिडी वाकचौरे यांच्यासह विविध मान्यवर कॅम्पस इंटरव्यू इंटरनेट प्रशिक्षण थेट भरती नोकरीच्या नवीन संधी अशा विविध क्षेत्रांमधून मार्गदर्शन करणार आहेत.

या वेगळ्या उपक्रमाचे आयोजनाबद्दल लोकनेते बाळासाहेब थोरात ,माजी आमदार डॉ सुधीर तांबे, कार्यकारी विश्वस्त सौ शरयूताई देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे ,डायरेक्टर अकॅडमी डॉ जे बी गुरव ,प्राचार्य डॉ. एम ए वेंकटेश,प्रा विजय वाघे यांनी आयोजकांचे अभिनंदन केले आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे