आपला जिल्हा

संजीवनीच्या पाच विद्यार्थ्यांची  ड्रिझल आयटी सर्विसेस मध्ये नोकरीसाठी निवड

संजीवनीच्या पाच विद्यार्थ्यांची  ड्रिझल आयटी सर्विसेस मध्ये नोकरीसाठी निवड


  इंटर्नशिप दरम्यानच पगार सुरू

जाहिरात

कोपरगांव विजय कापसे दि १५ फेब्रुवारी २०२६–  संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या पाच विद्यार्थ्यांची नामांकित आयटी कंपनी ड्रिझल आयटी सर्विसेस मध्ये नोकरीसाठी निवड झाली असुन विशेष  म्हणजे इंटर्नशिप  (आंतरवासिता) कालावधीतच त्यांना पगार सुरू झाला आहे. या यशामुळे महाविद्यालयाच्या गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण पध्दतीची आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या क्षमतेची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे, अशी  माहिती कॉलेजने प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

जाहिरात

      महाविद्यालयाच्या ट्रेनिंग अँड  प्लेसमेंट विभागाने विद्यार्थ्यांना उद्योगमान्य कौशल्यांचे प्रशिक्षण , मुलाखतींचा सराव,  तांत्रिक मार्गदर्शन  आणि सॉफ्ट स्किल्स विकास यांची प्रभावी तयारी करून घेतली. निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये कॉम्प्युटर इंजिनिअरींगच्या तन्मय राजेंद्र आचारे, रामेश्वर  दिलीप भांड, आदित्य संजय लोंढे, प्रियंका वसंत  मोहन व इन्फर्मेशन टेक्नॉलॉजीच्या समिक्षा किशोर  नरोडे यांचा समावेश  आहे.

जाहिरात

  मला  संजीवनी इंजिनिअरींग कॉलेज मधील उत्कृष्ट प्लेसमेंटची माहिती आधीपासूनच होती. म्हणूनच मी संजीवनीमध्ये प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला. आमच्या महाविद्यालयात विद्यार्थ्यांना उद्योग विश्वाशी जोडणाऱ्या , नव्या तंत्रज्ञानावर आधारित कार्यशाळा सातत्याने आयोजित केल्या जातात. त्याच अनुषंगाने ‘सेल्सफोर्स’ या जागतिक कीर्तीच्या एआय-आधारित कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट  प्लॅटफॉर्मवरील तंत्रज्ञानाची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती, त्यात मी सहभाग घेतला. यातुन मिळालेल्या ज्ञानाचा मला प्रत्यक्ष मुलाखतीच्या वेळी मोठा फायदा झाला. तसेच आमच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाने मुलाखत कशी द्यावी, प्रभावी संवादकौशल्य, आत्मविश्वासपूर्ण देहबोली आणि व्यावसायिक सादरीकरण याबाबत दिलेले मार्गदर्शन अत्यंत उपयुक्त ठरले. या सर्व तयारीमुळे माझी निवड ड्रिझल आयटी सर्विसेस या नामांकित कंपनीत झाली. याच कंपनीत मला पगारी इंटर्नशिप  करण्याची सुवर्णसंधीही मिळाली, जी खरोखच क्वचितच लाभणारी संधी आहे. संजिवनीमुळे माझ्या तसेच माझ्या आई-वडिलांच्या डोळ्यातले  स्वप्न साकार झाले. या यशामागे महाविद्यालयाचे मार्गदर्शन, शिक्षकांचे पाठबळ आणि माझ्या कुटुंबाचा विश्वास आहे, याचा मला मनापासून आनंद आणि अभिमान आहे.- समीक्षा नरोडे, विद्यार्थीनी.

जाहिरात

 संजीवनीचे अध्यक्ष नितिनदादा कोल्हे यांनी सर्व निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी त्यांचे अभिनंदन करून छोटेखानी कार्यक्रमात सत्कार केला. यावेळी डॉ. एम.व्ही. नागरहल्ली, डॉ. विशाल  तिडके, डॉ. माधुरी जावळे उपस्थित होते.

संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे यांनी नोकरीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार केला. सत्कारानंतर टिपलेले छायाचित्र. यावेळी डॉ. नागरहल्ली, डॉ. तिडके, डॉ. जावळे उपस्थित होते.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे