आपला जिल्हा
लाकडी घाण्यावरील निर्मित तेलाला एक्स्पो मध्ये वाढती मागणी
लाकडी घाण्यावरील निर्मित तेलाला एक्स्पो मध्ये वाढती मागणी
लाकडी घाण्यावरील निर्मित तेलाला एक्स्पो मध्ये वाढती मागणी
कोपरगाव विजय कापसे दि १६ फेब्रुवारी २०२६– तेल आणि मानवी आरोग्याचा अत्यंत जवळचा संबंध आहे त्यामुळे आपण कोणते खाद्य तेल आहारात वापरतो हे तितकेच महत्त्वाचे असल्याने याच बाबीचा विचार करत कोपरगाव येथील लक्षणी नॅचरल प्रॉडक्ट प्रोड्युसर कंपनी निर्मित लाकडी घाण्याच्या तेलाला कोपरगाव येथे सुरू असलेल्या बिजनेस एक्सपो मध्ये मोठ्या प्रमाणात मागणी वाढत असल्याचे दिसून येत आहे.
मानवी आरोग्याबाबत दिवसेंदिवस ज्या शारीरिक समस्या उद्भवत आहेत त्याचे मुख्य कारण हे आपल्या दैनंदिन आहारात मोठ्या प्रमाणात वापरले जाणारे रिफाइंड तेल हेच असल्याचे अनेक तज्ञांचे मत आहे परंतु या उलट लाकडी घाण्यापासून तयार केलेले तेल हे आरोग्यास फायदेशीर ठरत असल्याचा अनेक तज्ञांचा अहवाल आहे त्यामुळे सध्या या तेलाला बाजारपेठेत मागणी वाढत असल्याचे कोपरगाव येथे सुरू असलेल्या लायन्स,लिनेस, लियो व क्रेडाई बिजनेस एक्सपो मध्ये लक्षणी नॅचरल प्रॉडक्ट यांनी आपल्या कंपनीमध्ये लाकडी घाण्यापासून निर्मित शेंगदाणा तेल, मोहरी तेल, नारळ तेल,सूर्यफूल तेल, करडई तेल, तीळ तेल, जवस तेल, खुरासनी तेल, बदाम तेल व एरंडी तेल आदी मानवीय आरोग्यास उपयुक्त असलेल्या तेलाला मागणी वाढत आहे.

हे तेल परिपूर्ण नैसर्गिक पद्धतीने काढले जाते यात कोणत्याही प्रकारे रासायनिक घटकाचा वापर केला जात नाही यामध्ये १००% नैसर्गिक व जैविक घटक असल्याने तेलाला नैसर्गिक चव रंग आणि सुगंध येतो त्यामुळे लक्षणी नॅचरल प्रॉडक्ट निर्मित तेल हे मानवी आरोग्यास अत्यंत फायदेशीर ठरत आहे कोपरगाव शहरात मोठ्या प्रमाणात या तेलाला मागणी वाढत आहे विशेष म्हणजे शासनाच्या फेसाई मानकांनुसार या ठिकाणी तेलाची निर्मिती केली जाते त्यामुळे अत्यंत उच्च प्रतीचे शुद्ध व विश्वसनीय लाकडी घाण्यापासून निर्मित केलेले तेल या ठिकाणी मिळत आहे. या बिजनेस एक्सपो मध्ये सुरू असलेल्या लक्षणी लाकडी घाण्यापासून तेल निर्मित विक्री स्टॉलला गेल्या चार दिवसापासून अनेक प्रतिष्ठित नागरिकांनी भेटी देत मोठ्या प्रमाणात तेलाची खरेदी केली आहे.

यात प्रामुख्याने कोपरगाव येथील प्रसिद्ध विसपुते ज्वेलर्सचे सर्वेसर्वा दिपक विसपुते,प्रसिद्ध गणेश भेळचे सर्वेसर्वा गणेश लाडे, मुळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉ. शिरीष मुळे, प्रगतशील शेतकरी हेमंत बोरावके, प्रसिद्ध दंतरोग तज्ञ डॉ. गोविंद भोसले, प्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ.आप्पासाहेब आदिक, शिर्डी येथील प्रसिद्ध हृदय तज्ञ डॉ.देवरे आदींसह शहर व परिसरातील अनेक प्रतिष्ठित नागरिकांनी भेटी देऊन तेल खरेदी करत लाकडी घाण्यापासून निर्मित केलेल्या तेलाचे मानवी आरोग्याचे फायदे जाणून घेतले.




