शिर्डीत मोफत किडनी स्टोन शस्त्रक्रिया शिबिराचा समारोप समारंभ संपन्न

शिर्डीत मोफत किडनी स्टोन शस्त्रक्रिया शिबिराचा समारोप समारंभ संपन्न
शिर्डीत मोफत किडनी स्टोन शस्त्रक्रिया शिबिराचा समारोप समारंभ संपन्न

शिर्डी विजय कापसे दि १८ फेब्रुवारी २०२६–श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, शिर्डी आणि ग्लोबल किडनी स्टोन फाउंडेशन, अहमदाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या मोफत किडनी स्टोन शस्त्रक्रिया शिबिराचा समारोप समारंभ उत्साहात संपन्न झाला.शनिवार दिनांक 14 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारी २०२६ या कालावधीत आयोजित या शिबिरामध्ये गरजू रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या. या उपक्रमामुळे परिसरातील रुग्णांना मोठा दिलासा मिळाला. या समारोपीय समारंभाचे अध्यक्ष स्थान श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांनी भूषवले यावेळी ग्लोबल किडनी स्टोन फाउंडेशन, अहमदाबादचे . डॉ. केतन शुक्ला अमेरिकेवरून शशांक पाशुमार्थी लेफ्ट कर्नल डॉ. शैलेश ओक (वैद्यकीय संचालक), डॉ. प्रितम वडगावे (उपवैद्यकीय संचालक) आणि डॉ. मैथिली पितांबरे (वैद्यकीय अधीक्षक) यांची उपस्थिती होती शिबिर यशस्वी होण्या करिता डॉ राम नाईक डॉ विद्या बोराडे डॉ महेंद्र तांबे डॉ. मिलाप डॉ विनय डॉ दीपक नजन डॉ पल्लवी जगताप डॉ प्राजक्ता बनकर अधीसेविका नजमा सय्यद यांच्या सह नर्सिंग स्टाफ ब्रदर जनरल सर्जरी विभागा मधील कर्मचारी साईनाथ रुग्णालयामधील सर्व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले . तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली टीमने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया केल्या शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल वैद्यकीय अधिकारी व सहकार्य करणाऱ्या सर्व टीमचे यावेळी अभिनंदन करण्यात आले

समारोप प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी अशा प्रकारचे सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रम भविष्यातही सातत्याने राबविण्याचा मानस व्यक्त केला. गरजू रुग्णांना मोफत व दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे हेच साई संस्थानचे ध्येय असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.शिबिरादरम्यान 110 रुग्णांची तपासणी करण्यात आली असून त्यामधील 52 रुग्णांवर या दोन दिवसात यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. डॉक्टरांनी किडनी स्टोनची कारणे, प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि पाण्याचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले. संस्थानच्या वतीने अशा आरोग्यविषयक उपक्रमांद्वारे सर्वसामान्यांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सातत्याने केला जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी व स्वयंसेवक यांचे विशेष कौतुक करण्यात आले. हा शिबिराचा समारोपीय समारंभ सोमवार दिनांक १६ फेब्रुवारी २०२६ रोजी श्री साईनाथ रुग्णालय (२०० रुम), शिर्डी येथे पार पडला असून कार्यक्रमाचे प्रस्ताविक वैद्यकीय अधीक्षक डॉ मैथिली पितांबरे यांनी केले तर सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी सुरेश टोलमारे यांनी केले




