आपला जिल्हा

नगर- मनमाड हायवे दुरूस्त करा. अन्यथा उग्र आंदोलन करावे लागेल -राजेंद्र झावरे

नगर- मनमाड हायवे दुरूस्त करा. अन्यथा उग्र आंदोलन करावे लागेल -राजेंद्र झावरे

नगर- मनमाड हायवे दुरूस्त करा. अन्यथा उग्र आंदोलन करावे लागेल -राजेंद्र झावरे

जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि ३० ऑक्टोबर २०२५नागरिकांसाठी मृत्यूचा सापळा बनलेल्या अहिल्यानगर-मनमाड महामार्गाची पुरती वाट लागली असून, दररोज निष्पाप लोकांचे अपघातामध्ये बळी जात आहे.कोपरगाव शहरातील होतकरू तरुण दुचाकीवरून प्रवास करत असताना दुचाकी येवला नाका येथील खड्ड्यात आदळल्याने दुचाकीवरील तरुण बाजूला पडल्याने त्याच्या अंगावरून अज्ञात वाहन गेले. या भीषण अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. याबाबत स्थानिक प्रशासन जबाबदार आहे.त्यांच्यावर तात्काळ कारवाई करत नगर मनमाड महामार्ग दुरुस्त करावा अन्यथा मोठ्या प्रमाणावर आंदोलन करावे लागेल असा इशारा शिवसेना उबाठाचे सहसंपर्क प्रमुख राजेंद्र झावरे यांनी दिला आहे.

जाहिरात

यावेळी राजेंद्र झावरे म्हणाले की, नगर-मनमाड महामार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले आहे. हा महामार्ग जणू मृत्यूचा सापळा बनला असून, त्यात पडलेल्या खड्ड्यात पावसाचे पाणी साचले आहे. त्याचबरोबर रस्त्यावर कोणत्याही प्रकारची प्रकाशव्यवस्था नसल्याने वाहनचालकांना रस्ता ओळखणे कठीण झाले आहे. याच कारणामुळे आदित्य देवकर हा होतकरू तरुण मंगळवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास कोपरगाव शहराजवळील येवला नाका येथील बजाज शोरूम समोरून मार्गावर आपल्या दुचाकीवरून प्रवास करत असताना खड्ड्याच्या बाजूला पडला. आदित्य याच्या अंगावरून अज्ञात वाहन गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.आदित्यच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबाचा आधार हरपला आहे.दरवर्षी अनेक प्रवाशांचा या महामार्गावर बळी जात आहे. तरीही संबंधित विभाग आणि प्रशासनाकडून रस्त्याची योग्य दुरुस्ती करण्यात येत नाही. संबंधित बांधकाम विभागाच्या वरिष्ठानी तात्काळ करावाई करत या रस्त्यावरील खड्डे बुजवावे

जाहिरात

आणि रस्त्यावर योग्य प्रकाशव्यवस्था करावी अन्यथा आम्हाला आंदोलन करून प्रशासनाला धडा शिकवावा लागेल असेही शेवटी झावरे म्हणाले आहे.

राजेंद्र झावरे

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे