रामवाडीत ३३ वर्षीय युवकाचा निर्घृण खून; अवघ्या काही तासात आरोपी जेरबंद
रामवाडीत ३३ वर्षीय युवकाचा निर्घृण खून; अवघ्या काही तासात आरोपी जेरबंद
जाहिरात
कोपरगाव विजय कापसे दि २ मार्च २०२६–कोपरगाव शहर हद्दीतील रामवाडी परिसरात रविवार दिनांक १ मार्च रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास हनुमान मंदिरासमोर एका ३३ वर्षीय नवनाथ माधव कानफाटे या तरुणाचा दगड, वीट व लोखंडी कत्तीने मारहाण करून खून करण्यात आल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
जाहिरात
सविस्तर वृत्त असे की, मयत नवनाथ कानफाटे याचा भाऊ समाधान माधव कानफाटे यांनी कोपरगाव शहर पोलिस स्टेशनमध्ये दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे, मयत नवनाथ याचे आरोपींच्या बहिणीसोबत प्रेमसंबंध होते. याच कारणावरून आरोपींकडून त्याला यापूर्वीही धमकावण्यात आले होते, असा आरोप करण्यात आला आहे.जाहिरात
दरम्यान, रविवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास नवनाथ याला आरोपीनी फोन करून हनुमान मंदिरासमोर बोलवत “तू आमच्या बहिणीच्या गावाला का जातोस” या कारणाचा राग मनात धरून आरोपींनी आधीच कट रचत आरोपींनी लोखंडी कत्ती, वीट आणि दगडांनी नवनाथ यांच्या डोक्यावर जबरी वार करून त्याचा खून केला नुसार शहर पोलिस स्टेशनमध्ये करण सुदान मोरे, संजय सुदाम मोरे, समाधान कचरू पोटे (सर्व रा. रामवाडी) तसेच रोहित दयानंद पवार (रा. वारी) यांच्या विरुद्ध १०१/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम १०३ (१) ६२(२) ३५१ (३) ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जाहिरात
रात्री घडलेल्या या घटनेची माहिती मिळताच शिर्डी उपविभागीय पोलीस अधीक्षक अमोल भारती तसेच कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते.त्यांनी घटनास्थळाची बारकाईने पाहणी करत अधिक तपासासाठी फॉरेन्सिक पथकालाही बोलवत वेगाने तपास सुरू करून अवघ्या काही तासांत या चारही आरोपींना अटक केली. सदर घटनेचा पुढील तपास शहर पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार हे करत आहे.