कोपरगाव विजय कापसे दि ५ मार्च २०२६-आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीनुसार जयंती निमित्त शुक्रवार दि ६ जानेवारी रोजी कोपरगाव शहर शिवसेना, रिक्षासेना व शिवजन्मोत्सव समिती २०२६ यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवजयंतीचा अभूतपूर्व सोहळा आयोजित केला आहे.
जाहिरात
मुख्य कार्यक्रम सकाळी ६:०० वाजता शिवनेरी ते कोपरगाव पवित्र शिवज्योतीचे आगमन मृत्युंजय गणेश मंदिर, सावरकर चौक कोपरगाव येथे होईल, सकाळी ६:१५ ते ७:१५ वाजता महाराजांच्या मूर्तीवर विधीवत महामस्तक अभिषेक आणि पूजन सोहळा छत्रपती शिवाजी महाराज स्मारक कोपरगाव येथे संपन्न होईल, सकाळी ८:०० वाजता हिंदुहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे नियोजित स्मारक येथे मूर्ती पूजन करण्यात येईल. रात्री ८:०० वाजता शेकडो शिवभक्तांच्या उपस्थितीत आणि ढोल-ताशांच्या गजरात शिवरायांची महाआरती, फायर शो व शिवप्रसाद वाटप हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे नियोजित स्मारक कोपरगाव येथे करण्यात येईल.जाहिरात
तरी या भव्य दिव्य या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी आणि शिवरायांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन कोपरगाव शहर शिवसेना, रिक्षासेना व शिवजन्मोत्सव समिती २०२६ यांच्या वतीने करण्यात येत आहे.जाहिरात