आपला जिल्हा

परिचर्या सेवेतून समाजाचे आरोग्य उंचावेल; शलिनीताई विखे पाटील

परिचर्या सेवेतून समाजाचे आरोग्य उंचावेल; शलिनीताई विखे पाटील

दीपप्रज्वलन, शपथग्रहण, पदवी प्रदान, माजी विद्यार्थी मेळावा व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न

जाहिरात

अहिल्यानगर विजय कापसे दि ६ मार्च २०२६
रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा असून समाजाचे शारीरिक, मानसिक व सामाजिक आरोग्य उंचावण्याची मोठी जबाबदारी परिचर्या विद्यार्थ्यांवर आहे. सेवाभाव, शिस्त आणि समर्पण या गुणांच्या जोरावर परिचर्या विद्यार्थी समाजाच्या आरोग्य व्यवस्थेला अधिक सक्षम बनवतील,” असा विश्वास माजी जिल्हा परिषद अध्यक्षा  शलिनीताई विखे पाटील यांनी व्यक्त केला.

जाहिरात

डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनच्या परिचर्या महाविद्यालयात दि. ५ मार्च रोजी दीपप्रज्वलन, शपथग्रहण, पदवी प्रदान, माजी विद्यार्थी मेळावा आणि वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा  शलिनीताई विखे पाटील या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. तसेच फाउंडेशनचे विश्वस्त  वसंतराव शाहूजी कापरे हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते कार्यक्रमाच्या प्रारंभी आधुनिक परिचर्या सेवेच्या जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फ्लोरेन्स नाइटिंगेल यांच्या कार्याचे स्मरण करण्यात आले. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेत बी.एस्सी. नर्सिंग आणि जनरल नर्सिंग अँड मिडवाइफरी अभ्यासक्रमातील सुमारे १८० विद्यार्थ्यांनी मनोभावे रुग्णसेवेची शपथ घेतली.

जाहिरात

यावेळी पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या १२० विद्यार्थ्यांना प्रमुख अतिथींच्या हस्ते पदवी प्रदान करण्यात आली. विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करताना हॉस्पिटल टीममध्ये नर्सेसना समानतेची व सन्मानपूर्वक वागणूक मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली कार्यक्रमाच्या निमित्ताने आयोजित माजी विद्यार्थी मेळाव्यासाठी तब्बल १९५ माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. त्यांना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच महाविद्यालयाने आयोजित केलेल्या कला व क्रीडा विभागातील विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमुख अतिथींच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली.

जाहिरात

यावेळी महाविद्यालयाच्या वार्षिक नियतकालिकाचे तसेच नर्सिंगच्या शिक्षकांनी लिहिलेल्या “नर्सिंगमध्ये नेतृत्व आणि व्यवस्थापन” या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले आपल्या अध्यक्षीय भाषणात शलिनीताई विखे पाटील यांनी विखे पाटील परिचर्या महाविद्यालयात दिले जाणारे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण ही महाविद्यालयाची ओळख असल्याचे सांगितले. या शिक्षणाच्या परंपरेमुळे येथे प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची वेटिंग लिस्ट लागते, ही अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. यासाठी प्राचार्य व शिक्षकांचे त्यांनी विशेष कौतुक केले. तसेच पारितोषिक विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या संस्थेचे चेअरमन  राधाकृष्ण विखे पाटील तसेच संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनीही पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

जाहिरात

या कार्यक्रमाला संस्थेचे सेक्रेटरी डॉ. पी. एम. गायकवाड (टेक्निकल), संचालक (मेडिकल) प्रा. डॉ. अभिजीत दिवटे, ब्रिगेडियर डॉ. अरुण त्यागी (क्लिनिकल डायरेक्टर), मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रा. डॉ. रामचंद्र पडळकर यांच्यासह विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, विभागप्रमुख, शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या प्रारंभी प्राचार्या डॉ. प्रतिभा चांदेकर यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करून परिचय करून दिला. प्रा. अमोल टेमकर यांनी महाविद्यालयाचा वार्षिक अहवाल सादर केला. मोहिनी सोनावणे यांनी पदवी प्रदान कार्यक्रमाचे नियोजन केले, तर  निलेश म्हस्के यांनी माजी विद्यार्थी मेळाव्याचे नियोजन केले. वार्षिक नियतकालिक आणि पुस्तक प्रकाशनाचे काम सौ. पूजा मोरे व  राहुल कडू यांनी पाहिले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  स्टीफन भांबळ व ऋषाली कुंजिर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. अमित कडू, प्रा. सलोमी तेलधुणे, कविता भोकनाळ,  पल्लवी कोळपकर, पल्लवी खराडे,  वर्षा शिंदे व  विद्या कुऱ्हे यांनी परिश्रम घेतले. उपप्राचार्या डॉ. योगिता औताडे यांनी आभार प्रदर्शन केले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे