एकविरा व एसएमबीटीच्या वतीने शनिवारी मोफत कॅन्सर तपासणी शिबिर
महिला व युवतींनी लाभ घेण्याचे आवाहन

संगमनेर विजय कापसे दि १२ मार्च २०२६—सध्या वाढत चाललेले कॅन्सरचे प्रमाण हे अत्यंत चिंताजनक असून त्यावर योग्य उपचार घेतल्यास कॅन्सर बरा होत आहे. शनिवार दिनांक 14 मार्च 2026 रोजी एकविरा फाउंडेशन, इंडियन कॅन्सर सोसायटी व एसएमबीटी सेवाभावी ट्रस्ट यांच्याच्या वतीने महिला व युवतींसाठी मोफत कॅन्सर तपासणी शिबिर आयोजन करण्यात आले असल्याची माहिती एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्षा कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात यांनी दिली आहे.

मोफत कॅन्सर तपासणी शिबिराबाबत अधिक माहिती देताना डॉ. जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने एकविरा फाउंडेशनच्या वतीने महिलांसाठी क्रिकेट रस्सीखेच व बॅडमिंटन स्पर्धा सुरू असून यामधून सुमारे 5200 महिलांनी सहभाग घेतला आहे. महिलांच्या वाढत्या सहभागामुळे 2 दिवस स्पर्धा वाढवण्यात आले असून खेळांबरोबरच आरोग्य तपासणी ही केली जात आहे.

या स्पर्धेच्या निमित्ताने शनिवार दिनांक 14 मार्च 2026 रोजी सकाळी 10 ते 2 या वेळेत क्रीडा संकुलात सतर्क अभियानाच्या अंतर्गत इंडियन कॅन्सर सोसायटी व एसएमबीटी सेवाभावी ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य महिलांसाठी मोफत कॅन्सर तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या कॅन्सर तपासणीत यामध्ये ब्रेस्ट कॅन्सर, गर्भाशय, ब्लड, यांच्यासह विविध कॅन्सरची तपासणी केली जाणार आहे. याचबरोबर कोणी कॅन्सर बाबत पॉझिटिव्ह आढळल्यास अल्केम फाउंडेशन यांच्या सहकार्यातून पुढील 25 हजाराच्या तपासण्या मोफत केल्या जाणार आहेत.
यावेळी एसएमबीटी सेवाभावी हॉस्पिटल धामणगाव येथील कॅन्सर विभागातील तज्ञ डॉक्टर, दंतरोग तज्ञ स्त्रीरोगतज्ञ, तज्ञ स्टाफ उपस्थित राहून सर्व महिलांची तपासणी करणार आहेत
तरी शनिवारी होणाऱ्या या कॅन्सर तपासणी शिबिराचा तालुका व शहरातील 30 वर्ष वयापुढील महिला व पुरुषांनी लाभ घ्यावा असे आवाहन एकविरा फाउंडेशन एसएमबीटी सेवाभावी ट्रस्ट व इंडियन कॅन्सर सोसायटी यांच्या वतीने करण्यात आले आहे.
10 हजारांच्या तपासणी मोफत होणार
या शिबिरात महिलांच्या विविध कॅन्सर तपासणी करण्यात येणार आहेत. या तपासणी इतर खाजगी दवाखान्यांमध्ये केली तर त्याची फी साधारण 10 हजाराच्या पुढे आहे. तरी या शिबिरामधून सर्व महिलांची 10 हजारापर्यंतची मोफत कॅन्सर तपासणी होणार असल्याने या तपासणी शिबिराचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.



