आपला जिल्हा
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात तरुणांचे आयकॉन- डॉ सुधीर तांबे

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात तरुणांचे आयकॉन- डॉ सुधीर तांबे

संगमनेर विजय कापसे दि १३ मार्च २०२६–स्वतंत्र सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांना लहानपणापासूनच स्वातंत्र्य प्रेमाची व समाजकार्याची आवड होती. त्यावेळेस राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशाचे वातावरण स्वातंत्र्य प्रेमाने भारावून गेले होते. देश स्वतंत्र्यलढ्यासाठी एकवटला होता. सर्वच तरुण देश प्रेमाने आणि देशासाठी त्याग करण्याच्या उद्देशाने भारावून गेले होते. 1942 च्या चलेजाव आंदोलनात भाऊसाहेबांनी भाग घेतला त्यावेळेस त्यांचे वय अवघे 18 वर्षे होते. अत्यंत साहसी व धाडसी वृत्तीने त्यांनी या स्वातंत्र्य आंदोलनात भाग घेतला. मात्र आजच्या तरुणांना असे वाटते आहे की राजकारण हे आपले क्षेत्र नाही परंतु असे नाही चांगल्या समाज निर्मितीसाठी चांगले राजकारण गरजेचे असते.







