चौरंगीनाथ यात्रेचा श्रीफळ वाढून शुभारंभ तर सर्वांनुमते यात्रा कमिटीची निवड

चौरंगीनाथ यात्रेचा श्रीफळ वाढून शुभारंभ तर सर्वांनुमते यात्रा कमिटीची निवड
चौरंगीनाथ यात्रेचा श्रीफळ वाढून शुभारंभ तर सर्वांनुमते यात्रा कमिटीची निवड

कोपरगाव विजय कापसे दि १९ मार्च २०२६-– कोपरगाव तालुक्यातील करंजी पंचक्रोशीतील सर्व धर्मियांचे श्रद्धास्थान जागृत देवस्थान म्हणून सर्व परिचित असलेले श्री चौरंगीनाथ (मोठेबाबा) महाराजांच्या यात्रा उत्सवाचा शुभारंभ परंपरेनुसार गुरुवार दिनांक १९ मार्च रोजी साडेतीन शुभ मुहूर्तापैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या शुभदिनी गावातील जेष्ठ श्रेष्ठ सर्वधर्मीयांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढून सर्वांनुमते यात्रा कमिटीचे अध्यक्षपदी दादासाहेब भिंगारे, उपाध्यक्षपदी दगुनाना वाघ, सचिव पदी जावेद पठाण, सहसचिवपदी आकाश भिंगारे तर प्रसिध्दी प्रमुखपदी योगेश शिंदे यांची निवड करण्यात आली.

याप्रसंगी गावातील ज्येष्ठ नेते रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य कारभारी आगवन, यात्रा कमिटीचे मार्गदर्शक कार्याध्यक्ष तथा तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष संतोष भिंगारे, लोकनियुक्त सरपंच रवींद्र आगवण, गौतम सहकारी बँकेचे चेअरमन संजय आगवण, देविदास भिंगारे, गोरख भिंगारे, अरुण भिंगारे सांडूभाई पठाण, आशरफ इनामदार, अनिल शिंदे, अनिल डोखे, चंद्रकांत भिंगारे, बाबासाहेब कापसे,राजू शेख, अंबादास आगवन, दादासाहेब जोर्वेकर,जनार्दन बोर्डे, सोमनाथ काकडे, अल्ताफ इनामदार, योगेश आगवन, राजेंद्र आगवण, सुनील आगवण, अण्णासाहेब भिंगारे, जनार्दन बोरसे आदि सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

याप्रसंगी उपस्थित जेष्ठ कमिटी सदस्यांनी या यात्रेविषयी माहिती देताना सांगितले की गेल्या ४० वर्षापासून मोठ्या उत्साहात अक्षय तृतीयेच्या दिवशी पारंपरिक खेळ, विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करत गावातील घराघरात जणु दिवाळीचा सणच साजरा होतो.या पद्धतीने सादरी होत असलेल्या जागृत देवस्थान सर्व धर्मीयांच्या श्रद्धास्थान असलेल्या श्री चौरंगीनाथ महाराजांची यात्रेची महती सांगत सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या.






