आपला जिल्हा

आकारी पडित शेतकऱ्यांना जमिनी परत मिळवून देण्याच्या आश्वासनाची महायुती सरकारकडून पूर्तता: ना. राधाकृष्ण विखे पाटील

आकारी पडित शेतकऱ्यांना जमिनी परत मिळवून देण्याच्या आश्वासनाची महायुती सरकारकडून पूर्तता: ना. राधाकृष्ण विखे पाटील

आकारी पडित शेतकऱ्यांना जमिनी परत मिळवून देण्याच्या आश्वासनाची महायुती सरकारकडून पूर्तता: ना. राधाकृष्ण विखे पाटील

Loni vijay kapse दि २२ सप्टेंबर २०२६-“तालुक्यातील हरेगाव येथील आकारी पडित शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनी परत मिळवून देण्याच्या आश्वासनांची पूर्तता महायुती सरकारने केली आहे. हा ऐतिहासिक निर्णय होताना लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांचीही स्वप्नपूर्ती झाली आहे. शेतकऱ्यांच्या या प्रदीर्घ संघर्षात मलाही योगदान देता आल्याचे मनस्वी समाधान आहे,” असे प्रतिपादन जलसंपदा तथा पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

जाहिरात

आकारी पडित शेतकऱ्यांच्या जमिनी मूळ मालकांच्या नावावर करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले होते. त्या वेळी आंदोलनस्थळी जाऊन पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या जमिनींबाबत मंत्रिमंडळ लवकरच सकारात्मक निर्णय घेईल, असे आश्वासन दिले होते. मंत्रिमंडळाने हा ऐतिहासिक निर्णय घेतल्याबद्दल आकारी पडित शेतकऱ्यांनी मंत्री विखे पाटील यांची भेट घेऊन, त्यांचा सत्कार केला आणि जाहीर आभार मानले. या वेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, तालुकाध्यक्ष बाबासाहेब चेडे, गिरिधर आसने, दीपक पठारे, शरद नवले यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अॅड. अजित काळे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळानेही मंत्री विखे पाटील यांचा सत्कार करून कृतज्ञता व्यक्त केली.

जाहिरात

शेती महामंडळाच्या ताब्यात असलेल्या जमिनी पुन्हा मिळाव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांची होती. यासाठी अनेक वर्षे संघर्ष झाला. विशेष म्हणजे, या जमिनी शेतकऱ्यांना मिळू नयेत, असा ठराव तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या काळात झाला होता. राज्यात महायुती सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांच्या जमिनी पुन्हा त्यांना मिळाव्यात म्हणून शासनामध्ये तसेच न्यायालयातही भक्कम पाठपुरावा करण्यात आला; त्यामुळेच शेतकऱ्यांच्या या लढ्याला मोठे यश आले. या संपूर्ण निर्णयप्रक्रियेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सौ. सुनेत्राताई पवार आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे या सर्वांचे मोलाचे सहकार्य व पाठबळ मिळाल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.

जाहिरात

शेती महामंडळाच्या ताब्यात असलेल्या हरेगाव मळ्यातील आकारी पडित जमिनी शेतकऱ्यांच्या नावावर कराव्यात, या मागणीसाठी शेतकरी नेते अजित काळे यांनी हरेगाव येथे असंख्य शेतकऱ्यांच्या उपस्थितीत महिन्यापूर्वी आंदोलन केले होते. मंत्री विखे पाटील यांनी आंदोलनस्थळी जाऊन शेतकऱ्यांची भेट घेतली होती आणि जमिनी शेतकऱ्यांच्या नावावर होईपर्यंत कराव्या लागणाऱ्या सर्व कायदेशीर संघर्षात मी तुमच्या सोबत असल्याची ग्वाही दिली होती. यापूर्वी हरेगाव येथील जमीन उद्योगांना देण्याचा निर्णय झाल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये गैरसमज निर्माण करण्याचे राजकीय प्रयत्नही झाले; परंतु शेतकऱ्यांचे हक्क डावलून कोणताही निर्णय होणार नाही, ही भूमिका विखे पाटील यांनी ठामपणे मांडली होती.

“शेती महामंडळाच्या जमिनी मूळ मालकांच्या नावावर व्हाव्यात यासाठी अनेक वर्षे कॉ. माधवराव गायकवाड आणि आदरणीय खासदार साहेबांच्या नेतृत्वाखाली मोठा संघर्ष झाला. राज्यात महायुतीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर शेतकऱ्यांच्या या लढ्याला खरे यश मिळाले आहे. शेवटच्या शेतकऱ्याला न्याय मिळेपर्यंत कराव्या लागलेल्या या ऐतिहासिक प्रयत्नांमध्ये योगदान देता आले, ही माझ्यासाठी समाधानाची भावना आहे.”

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे