अमृतवाहीनी एमबीए मध्ये विद्यार्थ्यांना व्यावसायिक मूल्यांचे शिक्षण – विजय निकुंभ ( एच आर हेड आनंद आय पॉवर )
अमृतवाहीनी एमबीए मध्ये विद्यार्थ्यांना व्यावसायिक मूल्यांचे शिक्षण – विजय निकुंभ ( एच आर हेड आनंद आय पॉवर )

अमृतवाहिनी एमबीए मध्ये अंकुर 2k25 या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते. यावेळी माजी पदवीधर आमदार डॉ. सुधीर तांबे, संस्थेच्या कार्यकारी विश्वस्त सौ. शरयु देशमुख संस्थेचे कार्यकारी संचालक अनिल शिंदे , महाविद्यालयाचे संचालक डॉ. बी. एम. लोंढे आणि या अंकुर 2k25 प्रोग्राम चे समन्वयक डॉ.एन.एम. नायर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि प्रथम व द्वितीय वर्ष एमबीए विद्यार्थी उपस्याथित होते. यावेळी सर्वांच्या उपस्थितीत अंकुर 2k25 या कार्यक्रमाची सुरुवात झाली.

यावेळी विजय निकुंभ म्हणाले कि, माजी शिक्षण मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली अमृतवाहिनी ही संस्था देश पातळीवर गुणवत्तेच्या बाबतीत प्रसिद्ध आहे. विद्यार्थ्यांनी आपण एमबीए का करताय याचा विचार केला पाहिजे? व्यवस्थापन कौशल्ये शिकण्याची महत्वाची दहा कारणे आहेत. त्यामध्ये नेतृत्व कौशल्य वाढवणे, व्यक्तिमत्व विकास, सॉफ्ट स्किल सुधारणे, तांत्रिक कौशल्य सुधारणे, प्रतिष्ठित कंपनीत नोकरी मिळवणे, व्यवसाय कौशल्य वाढवणे, जागतिक बाजारपेठ आणि देशांतर्गत बाजारपेठ समजून घेणे, सुरक्षित उद्योजक बनणे, मार्केटिंग ज्ञान सुधारणे, शैक्षणिक ज्ञान सुधारणे, स्टेजवरील भीती नष्ट करणे, इंग्रजी संवाद सुधारण्यासाठी सार्वजनिक संवाद करणे. विद्यार्थीचा संवाद हा अनुकूल, सक्रिय, चांगला आणि सादरीकरण करणारा असावा या गोष्ठी महत्वाच्या आहेत. त्याचबरोबर त्यांनी अमृतवाहिनी एमबीए महाविद्यालयात प्रथम वर्ष विद्यार्थ्यांचा चालू शैक्षणिक वर्ष २०२५-२०२६ मध्ये अमृतवाहिनी एमबीएच्या वतीने अंकुर 2k25 या पाच दिवसांच्या इंडक्शन प्रोग्राम चे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.

या इंडक्शन प्रोग्राम साठी सेलिब्रिटी स्कूलचे सीईओ सिद्धार्थ प्रभाकर यांनी दोन दिवस एमबीए प्रथम वर्ष प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी आपले स्वतःचे नेटवर्क कोलाब्रेशन आणि पार्टनरशिप वाढविण्यावर भर द्यावा व उपलब्ध सोशल मीडियाच्या माध्यमांद्वारे मुख्यत्वे करून लिंकडीन लॉगिन करून त्याद्वारे व्यावसायिक कम्युनिटी नेटवर्कमध्ये सहभागी व्हावे त्यामुळे कार्पोरेट जगतातील सर्वच घटकांशी आपण जोडले जाऊन त्याद्वारे आपली प्रगती साधता येईल तसेच ज्यावेळी एमबीएच्या विद्यार्थ्यांनी नोकरीसाठी निवड करावयाची असते त्यावेळी विद्यार्थ्यांच्या विविध गुणांचा कौशल्यांचा विचार केला जातो त्यासाठी विद्यार्थ्यांनी विविध मॅनेजमेंट कौशल्य अवगत करावीत.
यांनी मार्गदर्शन करताना एमबीएच्या विद्यार्थ्यांनी करिअर घडवण्यासाठी स्वतःमध्ये स्पष्टता आणणे आवश्यक आहे. तसेच या दोन वर्षातील एमबीए पदवी संपादन करताना विद्यार्थ्यांनी स्वतःला अपडेट करून मॅनेजमेंटची विविध कौशल्य आत्मसात करावी व कॉर्पोरेट जगताला आवश्यक ती कौशल्य आत्मसात करावी यावर प्रकाश टाकला. विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित करून योग्य मार्गाने भविष्याची वाटचाल करावी असे सांगितले.

यानंतर त्यामध्ये त्यांनी कार्पोरेट जगात विद्यार्थ्यानी सॉफ्ट स्किल आत्मसात करून त्याद्वारे कॉर्पोरिट मध्ये आपली किंमत वाढवावी व नोकरीच्या संधीचा फायदा घ्यावा या स्कीलमध्ये पीपल्स स्किल, टीम बिल्डिंग, इंटर पर्सनल स्किल इफेक्टिव्ह कम्युनिकेशन स्किल, बिल्डिंग ट्रस्ट अॅड रीस्पोन्स, टाईम मॅनेजमेंट इत्यादी स्किल्स विषयी माहिती दिली.
या संपूर्ण पाच दिवसीय इंडक्शन प्रोग्रामच्या यशस्वीतेसाठी एमबीए द्वितीय वर्षातील विद्यार्थी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी श्रम घेतले व हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला याबद्दल संस्थेचे चेअरमन माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, विश्वस्त माननीय माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, संस्थेच्या कार्यकारी विश्वस्त सौ. शरयु देशमुख, संचालक इंद्रजीत थोरात संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, व्यवस्थापक प्राध्यापक व्ही.बी. धुमाळ आणि संस्थेचे डायरेक्टर अकॅडमीक डॉ. जे. बी. गुरव या सर्वानी एमबीए महाविद्यालयाच्या सर्व स्टाफचे अभिनंदन केले.




