आपला जिल्हा

पूर्व पापाने नजर गढूळ झाल्याने विरोधकांना पाणी स्वच्छ दिसेना – सोनल अजमेरे 

पूर्व पापाने नजर गढूळ झाल्याने विरोधकांना पाणी स्वच्छ दिसेना – सोनल अजमेरे 
पूर्व पापाने नजर गढूळ झाल्याने विरोधकांना पाणी स्वच्छ दिसेना – सोनल अजमेरे 
जाहिरात

Kopargaon vijay kapse दि २९ मार्च २०२६कोपरगाव नगरपरिषदेने नवीन पदाधिकारी निवडून आल्यानंतर मोठ्या प्रमाणावर विकास कामांना गती दिली आहे. नागरिकांचे मूलभूत प्रश्न पाणी स्वच्छता आरोग्य यावर विशेष भर दिला जातो आहे. पूर्वी प्रशासकीय काळात लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे शहराला प्रचंड अस्वच्छ पाण्याच्या त्रासाला सामोरे जावे लागले. पाण्याच्या फिल्टरेशन प्लांट वर असलेली वस्तुस्थिती आम्ही नगराध्यक्ष पराग संघाने स्वतः जाऊन पोलखोल केली होती. वास्तविक पाहता त्यामध्ये मोठे काम गेल्या दोन महिन्यात झाले आहे. पाण्याची गुणवत्ता सुधारल्याने विरोधकांचे अपप्रचाराचे स्वप्न गढूळ झाले आहे अशी टीका नगरसेविका सोनल अजमेरे यांनी विरोधकांवर केली आहे.

जाहिरात
विरोधकांना शहरात त्यांचा झालेला पराभव अद्यापही पचवता येत नाही. यापूर्वीच्या काळात आपण करून ठेवलेला गढूळपणा स्वच्छ करण्यात वेळ जातो आहे.यासह प्रभागात झालेली कामे श्रेय घेण्यासाठी स्वतःच सोशल मीडियावर टाकायची आणि नंतर पालिकेत येऊन निवेदनाचे नाटक करायचे असा दुटप्पी कारभार करणाऱ्यांना जनता पूरती ओळखून आहे. स्वप्नभंग झाल्यामुळे काहींना पूर्वीपेक्षा पाण्याची गुणवत्ता सुधारली आहे व आता मिळणाऱ्या स्वच्छ पाण्यातही गढूळ राजकारण करण्याची हौस आलेली आहे.

जाहिरात
कितीही नौटंकी केली तरी विरोधकांना जनता भूलणार नाही. स्वतः चुकीचे कामे करायची, जनतेच्या मूलभूत प्रश्नात स्वार्थाचे राजकारण साधायचे आणि होणाऱ्या कामांना नाकाबुल जायचे अशी संभ्रमावस्था विरोधकांची झाल्याने ते पालिकेवर टीका करत आहे.

जाहिरात
नागरिकांच्या येणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी नगराध्यक्ष पराग संधान व नगरसेवक व प्रशासन हे सक्षम आहे. ज्यांचे दिवास्वप्न भंग झाले म्हणून त्यांना राजकारण करायचे असेल तर त्यांना उत्तर योग्य पद्धतीने मिळेल असा इशारा सोनल अजमेरे यांनी दिला आहे.

नगरसेविका अजमेरे

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे