एक दिवसीय प्लॅस्टिक व्यवस्थापन कार्यशाळा उत्साहात संपन्न ; प्लॅस्टिक मुक्त कोपरगाव हेच ध्येय
एक दिवसीय प्लॅस्टिक व्यवस्थापन कार्यशाळा उत्साहात संपन्न ; प्लॅस्टिक मुक्त कोपरगाव हेच ध्येय
जाहिरात
कोपरगाव विजय कापसे दि १ एप्रिल २०२६-प्लॅस्टिक मुक्त कोपरगाव हेच ध्येय उराशी बाळगत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत कोपरगाव पंचायत समिती कार्यालय व गोदामाई प्रतिष्ठान ट्रस्ट कोपरगाव यांच्या वतीने प्लॅस्टिक कचरा पुनर्वापर व व्यवस्थापन करणे संदर्भात सखोल मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने तालुक्यातील सरपंच, प्रशासक, ग्रामपंचायत अधिकारी, शालेय मुख्याध्यापक यांच्याकरिता आयोजित प्लॅस्टिक पुनर्वापर व व्यवस्थापन एक दिवसीय कार्यशाळा मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
जाहिरात
कोपरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप दळवी यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार दि ३१ मार्च रोजी के जे सोमैय्या महाविद्यालयात आयोजित केलेल्या या कार्यशाळेचे उद्घाटन कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे ट्रस्टी संदीप रोहमारे यांच्या शुभहस्ते संपन्न होऊन उपस्थित सरपंच, प्रशासक, ग्रामपंचायत अधिकारी, शालेय मुख्याध्यापक यांना प्लॅस्टिक कचरा पुनर्वापर व व्यवस्थापन संबंधी पुणे येथील जलबिरादरी या संस्थेचे सदस्य तसेच सागर मित्र या अभियानाचे प्रणेते विनोद बोधनकर यांनी भूतलावर सर्वात घातक असलेल्या कधीही नष्ट न होणाऱ्या पर्यावरणास अत्यंत हानिकारक असलेल्या प्लॅस्टिक कचऱ्याचा पुनर्वापर कसा करायचा या विषयी सखोल असे मार्गदर्शन केले.जाहिरात
प्रसंगी चित्रपट अभिनेते चिन्मय उदगीरकर, गटशिक्षणाधिकारी शबाना शेख, सोमैय्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विजय ठाणगे, नमामी गोदाचे राजेश पंडित, व्यापारी महासंघाचे सुधीर डागा, कोपरगाव पंचायत समितीचे विस्तार अधिकारी बबन वाघमोडे, प्रशांत तोरवणे, जलबिरादारी या संस्थेचे नरेंद्र चूग, कॅप्टन बोधनकर, पत्रकार विनोद जवरे, पत्रकार सोमनाथ डफळ आदीसह तालुक्यातील सरपंच, प्रशासक, ग्रामपंचायत अधिकारी, शालेय मुख्याध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.जाहिरात
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक गोदामाई प्रतिष्ठान ट्रस्टचे आदिनाथ ढाकणे यांनी करत कार्यशाळा घेण्याचे उद्दिष्ट स्पष्ट केले तर गटविकास अधिकारी संदीप दळवी, कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटी संदीप रोहमारे, प्राचार्य डॉ विजय ठाणगे, अभिनेते चिन्मय उदगीरकर, नमामी गोदाचे राजेश पंडित यांनी प्लॅस्टिक पुनर्वापर व व्यवस्थापन संबधी कार्यशाळा आयोजित केल्याबद्दल आयोजकांचे आभार मानले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोमैय्या महाविद्यालयाचे डॉ.संजय दवंगे यांनी तर उपस्थितांचे आभार व्यापारी महासंघाचे सुधीर डागा यांनी व्यक्त केले. कार्यशाळा यशस्वीतेसाठी कार्यशाळेचे आयोजक गोदामाई प्रतिष्ठान ट्रस्टचे अध्यक्ष आदिनाथ ढाकणे, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे सचिव प्रा.विजय कापसे, कोपरगाव पंचायत समिती स्वच्छ भारत मिशनचे सचिन बोरुडे यांनी अथक परिश्रम घेतले.