करंजीच्या पार्थ भिंगारेची राष्ट्रीय स्पर्धेत चमकदार कामगिरी
करंजीच्या पार्थ भिंगारेची राष्ट्रीय स्पर्धेत चमकदार कामगिरी
जाहिरात
Kopargaon vijay kapse दि २ एप्रिल २०२६– सध्या मोबाईलच्या वाढत्या वापरामुळे आजकालच्या सर्व पिढीचे मैदानी पारंपारिक खेळाकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होत असल्याचे त्याचा मोठा परिणाम या पिढीच्या मनावर होत असला तरी या सर्वावर मात करत कोपरगाव तालुक्यातील करंजी येथील पार्थ चंद्रकांत भिंगारे याने नुकत्याच नाशिक येथे संपन्न झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत चमकदार कामगिरी करत गावाचं तालुक्याचे व शाळेचे नाव उज्वल करत मानाचा तुरा शिरपेचा ठरवला आहे.
जाहिरात
नुकत्याच नाशिक येथे संपन्न झालेल्या २२ व्या जम्प रोप सिनियर नॅशनल व ६ व्या ऑल इंडिया जम्प रोप चॅम्पियनशिप २०२६ स्पर्धेत माजी मंत्री सहकार महर्षी शंकरराव कोल्हे यांनी स्थापन केलेल्या संजीवनी इंग्लिश मीडियम स्कूल या शाळेत शिकणाऱ्या पार्थ चंद्रकांत भिंगारे सहभागी होत प्रथम क्रमांक मिळवत चमकदार कामगिरी केली आहे.जाहिरात
राष्ट्रीय स्तरावर संपन्न झालेल्या प्रतिष्ठित स्पर्धेत डबल डच स्पीड रिलेस ४३० या प्रकारात करंजीच्या पार्थ भिंगारे याने अतिशय सुंदर खेळाचे सादरीकरण करण राष्ट्रीय स्तरावरील या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवत सुवर्णपदक मिळवल्याबद्दल त्याचे व त्याला मार्गदर्शन करणारे शिक्षक व शाळेचे मुख्याध्यापक यांचे संजीवनी इंग्लिश मीडियम स्कूलचे मार्गदर्शक विवेक कोल्हे, स्कूलच्या मॅनेजिंग ट्रस्टी रेणुका कोल्हे आदींनी अभिनंदन करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे.जाहिरात