काका कोयटे यांच्या सहकार ध्यासाला महाडिक कुटुंबीयांची ताकद; महिला पतसंस्था चळवळीला नवी दिशा

काका कोयटे यांच्या सहकार ध्यासाला महाडिक कुटुंबीयांची ताकद; महिला पतसंस्था चळवळीला नवी दिशा
काका कोयटे यांच्या सहकार ध्यासाला महाडिक कुटुंबीयांची ताकद; महिला पतसंस्था चळवळीला नवी दिशा

Kopargaon vijay kapse दि ३ एप्रिल २०२६: सहकारी पतसंस्था चळवळ सक्षम करण्यासाठी काका कोयटे यांनी आयुष्य वाहून घेतले असून त्यांच्या कार्यामुळे महाराष्ट्रातील सहकार चळवळीला बळ मिळाले आहे. ही चळवळ अधिक सक्षम करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून महाडिक कुटुंबीय निश्चितपणे प्रयत्न करतील, असे प्रतिपादन राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी केले. महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या वतीने आयोजित कोल्हापूर येथील राज्यस्तरीय सहकारी पतसंस्था चळवळीतील महिला मेळाव्यात ते बोलत होते.

काका कोयटे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील पतसंस्था चळवळ अधिक बळकट होत असून सर्वसामान्य नागरिकांचा पतसंस्थांवरील विश्वास त्यांच्या प्रयत्नांमुळे वृद्धिंगत होत आहे. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अनेक प्रलंबित प्रश्न सरकारी दरबारी मार्गी लागले आहेत. या चळवळीला अधिक बळ देण्यासाठी महाडिक कुटुंबीयही सक्रियपणे सहभागी होणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. तसेच खासदार धनंजय महाडिक यांच्या माध्यमातून पतसंस्थांचे प्रश्न दिल्लीपातळीवर मांडले जाणार असून सहकार क्षेत्राला न्याय मिळवून देण्यासाठी ठोस प्रयत्न केले जातील, असे आश्वासन अरुंधती महाडिक यांनी आपल्या भाषणादरम्यान दिले.






