आपला जिल्हा

मतदारसंघातील संजय दिघे, मेघा वाघमारे यांची महाराष्ट्र पोलीस दलात निवड; नगरपालिकेकडून सन्मान

 मतदारसंघातील संजय दिघे, मेघा वाघमारे यांची महाराष्ट्र पोलीस दलात निवड; नगरपालिकेकडून सन्मान
मतदारसंघातील संजय दिघे, मेघा वाघमारे यांची महाराष्ट्र पोलीस दलात निवड; नगरपालिकेकडून सन्मान
जाहिरात

Kopargaon vijay kapse दि ६ एप्रिल २०२६कोपरगाव मतदारसंघातील कोकमठाण गावचे सुपुत्र माजी सैनिक संजय दिघे यांची अहिल्यानगर पोलीस कॉन्स्टेबल पदी तर कु. मेघा वाघमारे यांची बीड जिल्ह्यात पोलीस कॉन्स्टेबल पदी निवड झाल्याबद्दल कोपरगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष पराग संधान यांच्यावतीने सोमवारी नगरपालिकेत सन्मानसोहळा आयोजित करण्यात आला होता.यावेळी नगरपालिकेच्या वतीने राज्यसेवा करण्यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहे.यासह संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, मा.आ. स्नेहलताताई कोल्हे,युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांनीही या निवडीबद्दल हार्दिक अभिनंदन केले आहे.

जाहिरात
कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण गावचे सुपुत्र तथा माजी सैनिक संजय दिघे तसेच कु. मेघा वाघमारे हे दोघेही विद्यार्थी कोपरगाव नगरपालिकेच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाचे विद्यार्थी असून त्यांनी याच ठिकाणाहून मेहतीने अभ्यास करत महाराष्ट्र पोलीस भरतीची तयारी केली. त्यांच्या या जिद्द व चिकाटीमुळे यावर्षी झालेल्या पोलीस भरतीच्या लेखी व ग्राउंडमध्ये त्यांना चांगले मार्क मिळवून ते उत्तीर्ण झालेले आहेत. दोघेही अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून पोलीस सेवेत सहभागी झालेले आहेत. दोघांचाही विशेष सन्मान करत या निवडीचा खूप मोठा अभिमान वाटत असल्याचा मनोदय कोपरगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष पराग संधान यांनी व्यक्त केला.

जाहिरात
बीड जिल्हा पोलीस दलात भरती झालेली कु.मेघा वाघमारे हिचे वडील विजय वाघमारे हे कोपरगाव शहरात रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.तसेच भारत मातेची सेवा करताना माजी सैनिक म्हणून सेवेतून निवृत्त झालेले संजय दिघे यांनी अहिल्यानगर पोलीस दलात निवड होऊन राज्यसेवा करण्याचा सन्मान पटकावलेला आहे.यामुळे संपूर्ण कोपरगाव तालुक्यामध्ये त्यांचे कौतुक होत आहे.

जाहिरात
या निवडीबद्दल कोपरगाव नगर परिषदेच्या वतीने ६ एप्रिल रोजी नगराध्यक्ष पराग संधान यांच्या उपस्थितीमध्ये पोलीस दलात निवड झालेल्या दोन्हीही कर्तुतवानांचा सन्मान करण्यात आला. यावेळी सर्वांच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी कोपरगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष पराग संधान यांच्यासह नगरसेवक, भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी तसेच कोपरगाव शहरातील समस्त कार्यकर्ते आदी मोठ्या संख्येने सत्कार समारंभास उपस्थित होते.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे