ज्योती सहकारी पतसंस्थेचा मार्च अखेर ६७४ कोटींचा एकत्रीत व्यवसाय अॅड. बोरावके
ज्योती सहकारी पतसंस्थेचा मार्च अखेर ६७४ कोटींचा एकत्रीत व्यवसाय अॅड. बोरावके
ज्योती सहकारी पतसंस्थेचा मार्च अखेर ६७४ कोटींचा एकत्रीत व्यवसाय अॅड. बोरावके
Kopargaon vijay kapse दि ६ एप्रिल २०२६-नुकत्याच झालेल्या २०२५-२६ या आर्थिक वर्षात ज्योती सहकारी पतसंस्थेला ४ कोटी ५० लाख रु चा नफा झाला आहे. यामध्ये ४०६ कोटी रूपयांच्या ठेवी तर २६८ कोटी रुपयांची कर्ज वितरीत केली आहे. संस्थेची गुंतवणूक १६४ कोटी रूपयांची इतकी झाली आहे, संस्थेचा एकत्रित व्यवसाय ६७४ कोटी इतका झाला आहे ०.००% एन. पी. जे मुळे आपल्या ठेवी याच संस्थेत्त १००% सुरक्षित आहे अशी खात्री ठेवीदारांना झाली आहे व ग्राहकाच्या मनात विश्वास निर्माण झाला आहे अशी माहिती संस्थेचे चेअरमन अॅड. रविकाका बोरावके यांनी दिली.

सभासद व ठेवीदारांनी उत्तम प्रतिसाद दिल्याने संस्थेच्या भागभांडवलात व व्यवसायात समाधानकारक वाढ झाली आहे. लेखापरिक्षण वर्गात सातत्य राखण्यासाठी आवश्यक प्रमाणके संस्थेने पुर्ण करून सन २०२४-२५ या मागील आर्थिक वर्षासाठी शासकीय लेखा परिक्षणात ‘अ वर्ग मिळवला आहे, संस्थेने आवश्यक ती प्रमाणके पूर्ण करून ठेवी, कर्जे, भागभंडवल व गुंतवणूक या सर्वामध्ये वाढ झालेली दिसून येत आहे संस्थेच्या ३८ वर्षाच्या वाटचालीमध्ये सातत्याने विश्वास वाढतच चाललेला आढळून येतो, आपल्या चोख व्यवहारामुळे संस्थेस सर्वात्तम पतसंस्था पुरस्कार मिळालेला आहे. महाराष्ट्रतील एक अग्रगण्य पतसंस्था म्हणून ही ओळख निर्माण झाली आहे

संस्थेने सामाजिक कार्यात नेहमीच पुढाकार घेतला आहे. व पुढेही घेत राहील तसेच संस्थेच्या प्रगतीत सभासद, ठेवीदार, खातेदार, कर्जदार व ज्योती मंगल ठेव प्रतिनिधी, संस्थेचे सर्व संचालक, शाखधिकारी व कर्मचारी यांचे मोलाचे योगदान आहे असे संस्थेचे चेअरमन अॅड. रविकाका बोरावके यांनी सांगितले,

संस्थेच्या आर्थिक प्रगतीबाबत मागील वर्षाच्या तुलनेत ठेवी मध्ये ४६ कोटी, रुपयांची वाढ झाली असून तिचे प्रमाण १३ टक्के आहे तसेच कर्जामध्ये ३३ कोटी रुपयांची इतकी वाढ झाली असून तिचे प्रमाण १४ टक्के व गुंतवणूकीमध्ये १६ टक्के इतकी वाढ झाली आहे, अशी माहिती संस्थेचे व्यवस्थापक सुरेश शिंदे यांनी दिली,
संस्थेच्या एकूण व्यवसाय ६७४ कोटी इतका झाला असून त्याचे प्रमाण १३ टक्के इतकी वाढ झाली आहे. संस्थेचा नेट एन. पी. जे ०.००% राखण्याची परंपरा कायम ठेवली आहे. तसेच सहकार खातेचे नियमाचे पालन केलेले आहे. अशी माहिती संस्थेचे असि, मॅनेजर सुनील क्षिरसागर यांनी दिली.





