घरकुल धारकांना सोलर साठी मिळणार ८० हजाराचे अनुदान- गटविकास अधिकारी दळवी
घरकुल धारकांना सोलर साठी मिळणार ८० हजाराचे अनुदान- गटविकास अधिकारी दळवी
जाहिरात
कोपरगाव विजय कापसे दि ७ एप्रिल २०२६– महाराष्ट्र शासनाने प्रधानमंत्री आवास योजनेच्या ग्रामीण लाभार्थ्यांसाठी ज्यांचे घरकुल बांधून पूर्ण झाले आहे त्या सर्वांना आपल्या घरावर सोलर पॅनल म्हणजेच सूर्य घर निर्मिती साधन बसविण्यासाठी स्वतंत्र ८० हजार रुपयाचे अनुदान मिळणार असल्याची माहिती कोपरगाव तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप दळवी यांनी दिली आहे.
जाहिरात
याविषयी गटविकास अधिकारी दळवी यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, कोपरगाव तालुक्यात २०२४-२५ मध्ये ६०३४ घरकुलांचे उद्दिष्ट आले होते त्यापैकी ५३०० घरकुल लाभार्थ्यांना शासन नियमानुसार प्रथम हप्ता दिलेला होता प₹ तर दुसरा हप्ता ३५०० लाभार्थ्यांना दिला असून या सर्वांनी घरकुल बांधकाम सुरू केले आहे तर यापैकी ६०० लाभार्थ्यांची घर पूर्ण झाले असल्याची माहिती देत जे घरकुल लाभार्थी आपल्या घरावर सोलर बसवतील त्या सर्वांना शासनाकडून १ किलो वॅट सोलर करता १५ हजार राज्य सरकार, पीएम सूर्यघर योजना ३० हजार तर राज्य शासनाकडून जास्तीचा निधी म्हणून ३५ हजार रुपये असे एकूण ८० हजार रुपयांचे सोलर अनुदान मिळणार आहे ज्यांचे घर पूर्ण झाले आहेत त्या सर्वांना आपल्या घरावर सोलर बसून घ्यावा असे आवाहन गटविकास अधिकारी दळवी यांनी करत तालुक्यातील १८०० घरकुल लाभार्थ्यांनी घरकुल अनुदानाचा पहिला हप्ता घेतला आहे परंतु घरकुल बांधकाम सुरू केले नाही अशा लाभार्थ्यांनी तात्काळ घरकुल बांधकाम सुरू करावे अन्यथा अनुदान रुपी घेतलेली १५००० रुपयाची रक्कम तत्काळ शासनाला जमा करावी असे आवाहन केले आहे.जाहिरात
ज्या लाभार्थ्यांची घरकुल पूर्ण झाले आहे अशा घरकुल धारकांना सोलर बसवण्यासाठी पीएम सुर्यघर पोर्टलवर शासकीय नियमानुसार योग्य त्या कागदपत्रांची पूर्तता करत ऑनलाइन फॉर्म नोंदणी करावी व शासनाच्या वतीने सूर्यघर अनुदान ८० हजार रुपयांचे प्राप्त करून घ्यावे.