आपला जिल्हा

पथदिव्यांच्या उजेडात राष्ट्रवादीचा वैचारिक अंधार दूर व्हावा : दिपक जपे 

पथदिव्यांच्या उजेडात राष्ट्रवादीचा वैचारिक अंधार दूर व्हावा : दिपक जपे 
राष्ट्रवादीला दृष्टीदोष तपासण्याची गरज, पथदिव्यांचे काम सुरू असताना आंदोलनाची नौटंकी – दिपक जपे 
जाहिरात

Kopargaon vijay kapse दि ९ एप्रिल २०२६-श्री साईबाबा कॉर्नर ते टाकळी फाटा या मार्गावरील पथदिवे काम सुरू असून खांबांना रंग देत अधिक सुसज्ज करण्याचे काम कोपरगाव नगरपरिषदेकडून सुरू आहे. चालू असणाऱ्या कामांचे त्रास होत असल्याने वारंवार खोट्या आरोपांनी तोंडघशी पडणाऱ्या विरोधकांचे आणखी एक पितळ उघडे पडले असल्याची टीका दीपक जपे यांनी केली आहे.

जाहिरात
स्वतःच्या काळात लोकप्रतिनिधी यांना कवडीचे काम करता आले नाही.लोकप्रतिनिधी व प्रशासकीय काळात अनेक प्रश्न निर्माण झाले त्यावर काहीही कार्यवाही करता आली नाही असे स्वतःच कार्यशून्य असणारे विरोधक यांना पालिकेचे काम रुचत नाही हे स्पष्ट होते.

जाहिरात
युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली विश्वासनामा प्रत्यक्षात साकारण्यासाठी नगराध्यक्ष पराग संधान व उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर व सर्व सभापती आणि नगरसेवक यांचे काम सुरू आहे.कायमच काविळ झालेले राष्ट्रवादीचे लोक हे चालू कामांची सवंग लोकप्रियतेसाठी नाटक करत विरोधाची बाजू दाखवतात मात्र वास्तविक पाहता अनेक कामे आधीच सुरू झालेली आहे हे जनतेला दिसते आहे.
जाहिरात
भौतिक सुधारणा,विकासकामे गतिमान करणे,पाण्याच्या गुणवत्तेत सुधारणा,स्वच्छता,आरोग्य यासह अनेक कामे सुरू आहेत मात्र विरोधकांना सवयीप्रमाणे तोंडघशी पडण्याची त्यांनी कृती केली आहे असा टोलाही जपे यांनी लगावला आहे.

दिपक जपे

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे