साई शक्ती मध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांना जयंती निमित्त अभिवादन
साई शक्ती मध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांना जयंती निमित्त अभिवादन
Kopargaon vijay kapse दि ११ एप्रिल २०२६— क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या २०० व्या जयंतीनिमित्त ओम साई ग्रामीण शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष परशराम साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली व संस्थेच्या सचिव सुचित्रा साबळे यांच्या अध्यक्षतेखाली साई शक्ती इंग्लिश मीडियम स्कूल कासली मध्ये महात्मा जोतीराव फुले यांना अभिवादन करण्यात आले.जाहिरात
११ एप्रिल १८२७ रोजी सातारा जिल्ह्यातील कटगुण येथे जन्मलेले ज्योतिराव गोविंदराव फुले हे महाराष्ट्रातील सामाजिक सुधारणा चळवळीतील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्व म्हणून सर्व परिचित होते महात्मा ज्योतिराव फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले हे दोघेही स्त्री शिक्षणाचे प्रणेते आहे. ज्योतीरावांनी १९४८ मध्ये पुण्यात पहिली मुलींची शाळा सुरू केली. समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली असे एक ना अनेक अथांग कार्य असणारे ज्योतिराव फुले यांना १९८८ मध्ये महाराष्ट्रीयन सामाजिक कार्यकर्ते विठ्ठलराव कृष्णाजी वांडेकर यांनी महात्मा या उपाधीने गौरवले.जाहिरात
याप्रसंगी शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनी शिक्षकांनी आपल्या भाषणातून त्यांच्या महान कार्याची माहिती दिली तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुशांत साबळे, विलास चव्हाण, सोनाली कापसे, अलका जाधव, आयुब शेख आदी शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.