आपला जिल्हा

नर्सिंग शिक्षणात डिजिटल युगाची नवी दिशा ई-लर्निंग कंटेंट निर्मितीवर मार्गदर्शनपर सत्र उत्साहात संपन्न

नर्सिंग शिक्षणात डिजिटल युगाची नवी दिशा ई-लर्निंग कंटेंट निर्मितीवर मार्गदर्शनपर सत्र उत्साहात संपन्न

नर्सिंग शिक्षणात डिजिटल युगाची नवी दिशा ई-लर्निंग कंटेंट निर्मितीवर मार्गदर्शनपर सत्र उत्साहात संपन्न

जाहिरात

Ahilyanagar vijay kapse दि २१ एप्रिल २०२६-
आरोग्य शिक्षणाच्या बदलत्या प्रवाहात डिजिटल माध्यमांचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनच्या नर्सिंग महाविद्यालयात ई-लर्निंगसाठी विषयवस्तू निर्मिती परस्परसंवादी अध्यापनासाठी मल्टिमिडिया, पॉडकास्ट आणि डिजिटल साधनांचा प्रभावी वापर या विषयावर मार्गदर्शनपर सत्राचे आयोजन करण्यात आले. नर्सिंग शिक्षकांना आधुनिक अध्यापन पद्धतींचे प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने आयोजित या सत्राला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

जाहिरात

या सत्रासाठी प्रमुख संसाधन व्यक्ती म्हणून सहाय्यक प्राध्यापक श्री. अविनाश अ. पुंड (डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनचे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, अहिल्यानगर) यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. त्यांनी ई-लर्निंग कंटेंट तयार करताना मल्टिमिडिया साधनांचा प्रभावी वापर कसा करावा याचे सखोल मार्गदर्शन केले. व्हिडिओ, ऑडिओ, अ‍निमेशन आणि इन्फोग्राफिक्सच्या साहाय्याने अध्यापन अधिक आकर्षक आणि समजण्यास सुलभ बनवता येते, यावर त्यांनी विशेष भर दिला. नर्सिंग शिक्षणातील क्लिनिकल संकल्पना स्पष्ट करण्यासाठी पॉडकास्ट आणि सिम्युलेशन-आधारित डिजिटल टूल्स अत्यंत उपयुक्त ठरतात, असे त्यांनी सांगितले. तसेच विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग वाढवण्यासाठी क्विझ, ऑनलाइन चर्चा, इंटरअ‍ॅक्टिव्ह असाइनमेंट्स आणि फीडबॅक प्रणालींचा वापर कसा करावा, याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले. डिजिटल प्लॅटफॉर्मचा प्रभावी वापर केल्यास शिक्षण अधिक लवचिक, सुलभ आणि परिणामकारक बनते, असे त्यांनी स्पष्ट केले.

जाहिरात

या प्रशिक्षण सत्रामध्ये एकूण ५५ नर्सिंग शिक्षकांनी सहभाग नोंदविला. प्रश्नोत्तर सत्रादरम्यान सहभागी शिक्षकांनी विविध शंका उपस्थित करून विषयाचे सखोल आकलन करून घेतले.

कार्यक्रमासाठी वैद्यकीय संचालक डॉ. अभिजीत दिवटे तसेच डॉ. रामचंद्र पाडळकर यांनी मोलाचे सहकार्य व पाठिंबा दिला. त्यांनी नर्सिंग टीमच्या उपक्रमाचे कौतुक करून शिक्षकांचे अभिनंदन केले.
प्राचार्य डॉ. प्रतिभा ए. चांदेकर व उपप्राचार्य डॉ. योगिता औताडे यांनी कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी विशेष प्रयत्न केले. आयोजनासाठी श्री. दिनेश मगर यांनी सहकार्य केले, तर कु. संपदा म्हस्के यांनी सूत्रसंचालनाची जबाबदारी समर्थपणे पार पाडली.

एकूणच, या सत्रामुळे नर्सिंग शिक्षकांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अध्यापन अधिक प्रभावी आणि विद्यार्थीकेंद्रित बनवण्यासाठी आवश्यक कौशल्ये आत्मसात करण्याची संधी मिळाली.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे