आपला जिल्हा

लाडकी बहीण योजनेला विरोध करणाऱ्याकडून दुसरी कोणती अपेक्षा करणार- पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील

लाडकी बहीण योजनेला विरोध करणाऱ्याकडून दुसरी कोणती अपेक्षा करणार- पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील

लाडकी बहीण योजनेला विरोध करणाऱ्याकडून दुसरी कोणती अपेक्षा करणार- पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील

Ahilyanagar vijay kapse दि २१ एप्रिल २०२६पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने संसदेत आणलेल्या महीला विधेयकाची भूमिका अतिशय शुध्द होती.मात्र ज्यांना या विधेयकाची हत्या करायची होती त्या विरोधी पक्षांचा महीला विरोधी चेहरा देशासमोर आला.लाडकी बहीण योजनेला विरोध करणाऱ्याकडून दुसरी कोणती अपेक्षा करणार असा सवाल जलसंपदा तथा पालक मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.

जाहिरात

महीला विधेयकाच्या समर्थनार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आरक्षणाच्या समर्थनार्थ एक कोटी सह्या गोळा करण्यात येणार असून,ठिकठिकाणी मेळावे घेवून काॅग्रेस,शरद पवार गट,उध्दव ठाकरे यांचा पक्ष तृणमूल काँग्रेस द्रमूक या पक्षानी महीला आरक्षण विधेयकाची हत्या केल्याचे ठणकावून सांगण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

जाहिरात

विरोधी पक्षांकडून केल्या जाणार्या टिकेचा समाचार घेताना मंत्री विखे पाटील म्हणाले की,याच पक्षांनी २०२३साली महीला आरक्षण विधेयक मतदारसंघाची पुर्नरचना आणि जनगणने प्रमाणे लागू हे मान्य केले होते.मात्र आज दोन तृतीयांश बहुमताचा पेच लक्षात येताच या पक्षांनी भूमिका बदलल्याचे सांगितले. राज्यात महायुती सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेला विरोध करणारे आणि योजना बंद पडावी म्हणून न्यायालयात जाणारे सुध्दा हेच चेहरे होते.त्यामुळे महीलांच्या योजनेला विरोध करणाऱ्या कडून दुसरी काय अपेक्षा करणार ॽअसा प्रश्न केला.

जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे