शिवाजी कोण होता या पुस्तकाचे आज संगमनेरात सामूहिक वाचन

शिंदे सेनेचे संजय गायकवाड यांनी केलेल्या विधानाच्या निषेधार्थ आंदोलन

Sangmner vijay kapse दि २५ एप्रिल २०२६–हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण जगाचे आराध्य दैवत आहे. सर्व समाजाला बरोबर घेऊन त्यांनी स्वराज्य निर्माण केले. संगमनेर मधील सर्व राजकीय पक्ष व पुरोगामी संघटना यांच्या वतीने रविवार दिनांक 26 मार्च 2026 रोजी सकाळी 8 ते 10 या वेळेत नेहरू गार्डन संगमनेर येथे कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता या पुस्तकाचे सामूहिक वाचन करण्यात येणार आहे. यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात येणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांनी 18 पगड समाजातील सर्वांना बरोबर घेऊन स्वराज्य निर्माण केले. त्यांच्या मावळ्यांमध्ये विविध जाती धर्मातील व मुस्लिम समाजातील हे अनेक कर्तबगार पुरुष होते. या सर्वांची माहिती असणारे व कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी लिहिलेले शिवाजी कोण होता हे पुस्तक महाराष्ट्रात लोकप्रिय आहे. मात्र अपूर्ण माहितीच्या आधारे शिंदे सेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी या पुस्तकाबाबत वाद निर्माण केला असून प्रकाशात बाबत अत्यंत घाणेरडी भाषा वापरली आहे. यामुळे महाराष्ट्रात आणि समाजात त्यांच्याविषयी मोठा असंतोष निर्माण झाला आहे.

समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या संजय गायकवाड यांनी केलेल्या बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ संगमनेर मधील सर्व राजकीय पक्ष व पुरोगामी संघटना यांच्या वतीने 10 वाजता संगमनेर बस स्थानक येथे तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे. या सामूहिक पुस्तक वाचन कार्यक्रम व संजय गायकवाड यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ संगमनेर मधील सर्व राजकीय पक्ष, पुरोगामी व समाजसेवी संघटना, युवक संघटना, महिला संघटना, पदाधिकारी कार्यकर्ते पुरोगामी संघटना यांचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.




