आपला जिल्हा

संजीवनीच्या विद्यार्थ्यांची आयआयटी गुवाहाटीमध्ये इंटर्नशिपसाठी निवड

संजीवनीच्या विद्यार्थ्यांची आयआयटी गुवाहाटीमध्ये इंटर्नशिपसाठी निवड

देशातील प्रतिभावान विद्यार्थ्यांच्या गटात संजीवनीच्या विद्यार्थ्यांचा समावेश

Kopargaon vijay kapse दि २३ सप्टेंबर २०२६ : संजीवनी युनिव्हर्सिटीच्या चार विद्यार्थ्यांची इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी), गुवाहाटी, आसाम येथे सहा महिन्यांच्या इंटर्नशिपसाठी निवड झाली आहे. देशातील विविध नामांकित शैक्षणिक संस्थांमधील प्रतिभावान विद्यार्थ्यांमध्ये संजीवनीच्या विद्यार्थ्यांनी मिळविलेले हे यश विद्यापीठाच्या शैक्षणिक गुणवत्तेचे आणि संशोधनाभिमुख शिक्षणपद्धतीचे द्योतक मानले जात आहे.

जाहिरात

संजीवनी युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीच्या तृतीय वर्षातील कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग (सीएसई) विभागातील दिव्या रावसाहेब वारुळे व रोहन आत्माराम निकम, तसेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स (एआयडीएस) विभागातील जय निलेश जोबनपुत्रा व तनिष्क सचिन पहाडे यांची या प्रतिष्ठित इंटर्नशिपसाठी निवड झाली आहे.

जाहिरात

इंटर्नशिपदरम्यान दिव्या वारुळे या आयआयटी गुवाहाटीतील तज्ज्ञ प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली ‘फुल स्टॅक वेब अँड अॅप्लिकेशन डेव्हलपमेंट’ या विषयावर संशोधन व प्रकल्प कार्य करणार आहेत. तर रोहन निकम, जय जोबनपुत्रा आणि तनिष्क पहाडे हे ‘एआय, मशीन लर्निंग, कॉम्प्युटर व्हिजन अँड अॅप्लिकेशन डेव्हलपमेंट’ या अत्याधुनिक विषयांवर संशोधनात्मक कार्य करणार आहेत.

जाहिरात

आयआयटी गुवाहाटीने इंटर्नशिपसाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून आवश्यक तपशिलांसह अर्ज मागविले होते. विद्यार्थ्यांनी प्रा. ज्योतिमई कलिता यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक बाबींची पूर्तता करून अर्ज सादर केले. त्यामध्ये एआय स्किल्स, कॉम्प्युटर व्हिजन, फुल स्टॅक डेव्हलपमेंट आदी कौशल्यांचा समावेश होता. आयआयटीच्या निकषांची पूर्तता केल्यानंतर मुलाखतीच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांची निवड झाली.

देशातील अग्रगण्य तंत्रज्ञान संस्थेत संशोधनाची संधी मिळणे ही विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण उपलब्धी मानली जात आहे. या इंटर्नशिपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे संशोधन वातावरण, आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव तसेच उद्योगक्षेत्रातील नव्या संधींची ओळख होणार आहे.

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संजीवनीचे अध्यक्ष श्री. नितीनदादा कोल्हे, युनिव्हर्सिटीचे अध्यक्ष श्री. अमित कोल्हे, व्हाईस चान्सलर डॉ. ए. जी. ठाकूर, डीन डॉ. कविथा राणी, विभागप्रमुख डॉ. महेंद्र गवळी आणि डॉ. किशोर जाधव यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

ग्रामीण विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेची राष्ट्रीय पातळीवर दखल

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी देशातील सर्वोच्च तांत्रिक संस्थांमध्ये स्वतःची गुणवत्ता सिद्ध करणे ही संजीवनीसाठी अभिमानाची बाब आहे. आयआयटी गुवाहाटीसारख्या प्रतिष्ठित संस्थेत संशोधनाची संधी मिळणे म्हणजे विद्यार्थ्यांच्या ज्ञान, कौशल्य आणि नवोन्मेषी क्षमतेची राष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेल्याचे द्योतक आहे. यापूर्वीही संजीवनीच्या विद्यार्थ्यांनी रशिया, फिलीपिन्स, कॅनडा, यूके, जपान, तैवान आदी देशांतील विविध विद्यापीठांमध्ये संपूर्ण शिष्यवृत्तीवर २३० पेक्षा अधिक इंटर्नशिप पूर्ण करून आपल्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या आहेत. अशा संधींमुळे विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे तांत्रिक ज्ञान, संशोधनाचा अनुभव आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर स्वतःची ओळख निर्माण करण्याची संधी मिळत आहे.

—  अमित कोल्हे
प्रेसिडेंट, संजीवनी युनिव्हर्सिटी

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे