कोपरगावात शिवसेना पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न

कोपरगावात शिवसेना पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न
कोपरगावात शिवसेना पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न

Kopargaon vijay kapse दि २६ एप्रिल २०२६– पक्षाचं काम न करता पदाचा दुरुपयोग करणाऱ्या पदाधिकाऱ्यांचे पद काढून घेण्याचे काम पक्ष करील. पक्षासाठी काम करून जनतेला न्याय देणाऱ्या उमेदवाराला शिवसेनेत काम करण्याची संधी दिली जाईल. ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या तत्त्वावर शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करायचं आहे.शेवटच्या घटकापर्यंत न्याय देण्याचे काय एकनाथ शिंदे साहेब यांनी केले आहे. माझ्यासारख्या सर्वसामान्य महिलेला राज्यसभेची खासदारकी बहाल केली. महिला शेतकरी वारकरी व रुग्णांसाठी विविध योजना त्यांनी सुरू केल्या. संत महंतांना संरक्षण ,वारकरी दिंडीला अनुदान, विमा कवच यामुळे त्यांनी महाराष्ट्रातील सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री म्हणून नाव कोरले.वारकऱ्यामध्ये विठ्ठल शोधणारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रूपाने महाराष्ट्राने पाहिला असल्याचे प्रतिपादन राज्यसभा खासदार शिवसेना शिवसेनेचे उपनेत्या खा ज्योतीताई वाघमारे यांनी कोपरगाव येथे पोहेगाव नागरी पतसंस्थेच्या सभागृहात कोपरगाव विधानसभा पदाधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना बोलत होत्या.

अध्यक्षस्थानी माजी खासदार सदाशिवराव लोखंडे होते. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख नितीनराव औताडे, महिला आघाडीच्या शिवसेना जिल्हाप्रमुख विमलताई पुंडे, युवा सेना जिल्हाप्रमुख महेश देशमुख, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अशोकराव नवले, सर्जेराव कदम, शिवाजी जाधव, उपजिल्हाप्रमुख देवा लोखंडे, शिवसेना शहरप्रमुख अध्यक्ष अक्षय जाधव, सुभेदार शांतीलाल होन, देवा लोखंडे, अमोल औताडे, दिपक औताडे, प्रल्हाद सारंगधर, वैभव चव्हाण, घनश्याम वारकर, आरतीताई गाडे, सुनील साळुंके, कृष्णा चोरगे, महेश देशमुख, दिगंबर पवार, रमेश काळे, साईनाथ जाधव,भारतीताई शिंपी, वर्षाताई शिंगाडे, बाळासाहेब साळुंके, योगेश उशीर, विकास शर्मा रवी भालेराव अदीसह शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मतदार याद्या पुनर्नरीक्षणावर मार्गदर्शन करण्यात आले. मतदार यादीत आपल्या वार्डातील कोणाचे नाव राहिले असेल किंवा कोणाचे नाव दुबार झाले असेल अशा गोष्टीवर बारकाईने लक्ष देण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. बुथ लेव्हल असिस्टंट म्हणून शिवसेनेच्या वतीने बूथ प्रमुखांची नेमणूक करण्यात आली. यावेळी बोलताना खा. सदाशिवराव लोखंडे यांनी सांगितले की शिर्डी लोकसभा मतदारसंघात विकास कामे करत असताना प्रसिद्धीसाठी कधी अट्टाहास घेतला नाही. कोपरगाव तालुक्यातील पोहेगावच्या वरच्या ११ गावात निळवंडे चे पाणी पोहोचवण्यासाठी उपमुख्यमंत्री व तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन टीएमसी पाणी सुरुवातीला पोहोचवण्याचे काम केले.

नवीन मतदार वाढवण्यासाठी कार्यकर्त्यांनी काम करावे, शिवसेना संघटन वाढवावे असे आवाहन त्यांनी केले. तर शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन औताडे यांनी सांगितले की कोपरगावात प्रस्थापितांच्या विरोधात शिवसेनेची ताकद टिकवण्यासाठी तत्त्वाचं राजकारण करून विरोध करावा लागतो. साखर कारखाने व शिक्षण संस्थांच्या साम्राज्या पुढे शिवसेनेचे कष्टकरी शिवसैनिक स्वाभिमानाने शिवसेनेत टिकून आहे. शिर्डी लोकसभेत माजी खा सदाशिवराव लोखंडे यांच्या पराभवाने खूप मोठे नुकसान झाले असल्याचे औताडे बोलून दाखवले. सूत्रसंचालन राहुल यांनी केले तर प्रास्ताविक आभार शिवाजी जाधव यांनी मानले.



