आपला जिल्हा

गुणवंतांचा सन्मान म्हणजे गुणवत्तेचा व उद्याच्या उज्ज्वल भविष्याचा सन्मान-आमदार आशुतोष काळे

गुणवंतांचा सन्मान म्हणजे गुणवत्तेचा व उद्याच्या उज्ज्वल भविष्याचा सन्मान-आमदार आशुतोष काळे

गुणवंतांचा सन्मान म्हणजे गुणवत्तेचा व उद्याच्या उज्ज्वल भविष्याचा सन्मान-आमदार आशुतोष काळे

गोदावरी बायोरिफायनरीज

Kopargaon vijay kapse दि १ मे २०२६ :- शिक्षणात गुणवत्ता हाच प्रगतीचा खरा पाया आहे. रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाने शैक्षणिक दर्जा आणि गुणवत्तेच्या बाबतीत आपला वेगळा ठसा उमटवला असून हे यश प्राचार्य शाखाप्रमुख गुणवंत शिक्षक आणि रयत सेवकांच्या सांघिक प्रयत्नांचे फळ आहे म्हणून गुणवंतांचा सन्मान म्हणजे गुणवत्तेचा व उद्याच्या उज्ज्वल भविष्याचा सन्मान आहे असे प्रतिपादन उत्तर विभागाचे विभागीय चेअरमन आमदार आशुतोष काळे यांनी समन्वय समितीच्या व्यासपीठावरून केले.

जाहिरात

रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाच्यावतीने आयोजित ‘समन्वय समिती सहविचार व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ’ प्रसंगी अध्यक्षीय भाषणात आमदार आशुतोष काळे बोलत होते. ते पुढे म्हणाले की, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.खासदार शरदचंद्र पवारसाहेब यांचे विचार काळाच्या पुढे असतात व त्यामुळेच संस्था डिजिटल झाली आहे. मा.चेअरमन चंद्रकांत दळवी साहेब, व्हा. चेअरमन ॲड.भगीरथ शिंदे आणि विभागीय मॅनेजिंग कौन्सिल यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर विभाग गेली पाच सहा वर्षे भौतिक सुविधा व गुणवत्तेत प्रथमस्थानी आहे आणि हीच परंपरा आपण यापुढे पण सातत्याने पुढे घेऊन जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

जाहिरात

बैठकीपूर्वी रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील व रयत माउली लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करण्यात आली.मान्यवरांचे स्वागत विभागीय अधिकारी नवनाथ बोडखे आणि सहायक विभागीय अधिकारी बाबासाहेब नाईकवाडी यांनी केले. प्रास्ताविक करतांना नवनाथ बोडखे यांनी शैक्षणिक भौतिक व मूलभूत सुविधांची तपशीलवार मांडणी केली. आजच्या स्पर्धेचा गुणवता हा एकमेव मापदंड समोर ठेवून विभागचे चेअरमन व विभागीय व्यवस्थापन कमिटीच्या मार्गदर्शनाखाली कामकाज करीत आहे. गुणवत्तेमुळेच विद्यार्थी संख्या वाढत आहे.शिक्षकांची पदे रिक्त असतांनाही शैक्षणिक कामकाजाचा अतिरिक्त भार शाखाप्रमुख व शिक्षक शिक्षिका सहन करीत आहेत.संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली विभागातील प्रत्येक वर्ग खोलीमध्ये इंटरॅक्टिव्ह पॅनल बोर्ड बसवण्यात आपण यशस्वी झालो आहोत. गुणवत्ता कक्षाच्या माध्यमातून आपण विविध स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून दहा कोटी पेक्षा अधिक शासकीय शिष्यवृत्ती प्राप्त केली आहे. यात विभागीय चेअरमन आमदार आशुतोष काळे साहेब यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले असल्याचे त्यांनी सांगितले.

जाहिरात

या बैठकीपूर्वी रयत शिक्षण संस्थेच्या व्यवस्थापन मंडळाच्या सदस्या श्रीम. मीनाताई जगधने यांना श्रीरामपूर शहर भीमोत्सव समितीतर्फे भारतरयत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला त्याबद्दल त्यांचा ॲड.भगीरथ शिंदे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी सभेला संबोधित करताना व्हा. चेअरमन ॲड.भगीरथ शिंदे म्हणाले की,जेव्हा गुणवत्ता बोलू लागते, तेव्हा प्रगतीचे नवे मार्ग प्रशस्त होतात. उत्तर विभागाचा हा सन्मान सोहळा विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल गुणवत्ता कक्षाचे काटेकोर नियोजन व पाठपुरावा यामुळेच हे यश मिळाले असल्याचे त्यांनी सांगितले.

जाहिरात

उत्तर विभागातील ज्या शाखांनी शैक्षणिक वर्षात उत्कृष्ट कामगिरी केली आहे अशा गुणवंत शाखांचा विशेष सन्मान करण्यात आला. तसेच शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी शिक्षक यांचा गुणगौरव करण्यात आला. प्रसंगी विभागीय गुणवत्ता कक्ष मार्गदर्शक काकासाहेब वाळुंजकर यांच्यासह व गुणवंत शिक्षकांचा गौरव करून त्यांना प्रोत्साहित करण्यात आले.व्हा.चेअरमन ॲड.भगीरथ शिंदे यांनी विभागीय कामकाजाचे कौतुक केले व अडचणींना सामोरे जात आपण पुढे जाणार आहोत. जागतिक पातळीवर शिक्षणात झपाट्याने बदल होत आहेत व रयत ही एकमेव संस्था आहे जी परिवर्तनशील आहे व यापुढेही संस्थेचे अध्यक्ष मा.खासदार शरदचंद्र पवारसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कामकाज करणार आहोत.

याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष अरुण कडू पाटील, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य दादाभाऊ कळमकर, जनरल बॉडी सदस्य, बाबासाहेब भोस, कुंडलिकराव दरेकर,ज्ञानदेव पांडुळे, इंजिनिअर अनिल साळुंखे,प्रा. ए. टी. पोकळे, संदीप वर्षे,मा. सचिव शिवाजी भोर, पद्माकांत कुदळे, मोहन काकड, अण्णासाहेब शेलार,कारभारी आगवन,मनोज कवडे, सुरेश बोळीज तसेच विभागातील शाखांचे प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, समन्वय समितीचे सदस्य लाईफ मेंबर्स व लाईफ मेंबर्स पालक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुधीर साबळे आणि मंजूश्री धीवर यांनी सूत्रसंचालन केले तर सहाय्यक विभागीय अधिकारी प्रमोद तोरणे यांनी आभार मानले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे