पुणतांबा मंडळातील ६८०७ शेतकऱ्यांना १२.०२ कोटी पिक विमा मंजूर-आमदार आशुतोष काळे
पुणतांबा मंडळातील ६८०७ शेतकऱ्यांना १२.०२ कोटी पिक विमा मंजूर-आमदार आशुतोष काळे
पुणतांबा मंडळातील ६८०७ शेतकऱ्यांना १२.०२ कोटी पिक विमा मंजूर-आमदार आशुतोष काळे

Kopargaon vijay kapse दि ११ मे २०२६ :- कोपरगाव मतदारसंघातील पुणतांबा मंडळात मागील वर्षी खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांसाठी तब्बल १२ कोटी २ लाख रुपयांची पिक विमा नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे. या अंतर्गत पुणतांबा मंडळातील सुमारे ६८०७ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पंतप्रधान पिक विमा योजनेअंतर्गत उत्पादन आधारित नुकसान भरपाई मिळणार असल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली.

मागील वर्षी खरीप हंगामात झालेल्या सततच्या अतिवृष्टीमुळे पुणतांबा परिसरातील अनेक शेतकऱ्यांची पिके काढणीच्या टप्प्यावर असतानाच पूर्णपणे भुईसपाट झाली होती. सोयाबीन, बाजरी, कापूस, तूर, मका तसेच इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले होते. या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी महसूल व कृषी विभागाला सरसकट पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या होत्या.त्यानंतर राज्य शासन आणि संबंधित विमा कंपनीकडे सातत्याने पाठपुरावा करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना यश मिळाले असून पुणतांबा मंडळातील ६८०७ शेतकऱ्यांसाठी १२.०२ कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे.

आमदार आशुतोष काळे म्हणाले की, “शेतकरी हा देशाचा कणा असून नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीत महायुती शासन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळावी यासाठी सातत्याने शासन स्तरावर पाठपुरावा केला. त्यातून ही मोठी मदत मंजूर झाली असून लवकरच संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.पिक विम्याच्या नुकसान भरपाईच्या मिळणाऱ्या रक्कमेतून अतिवृष्टीमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून, परिसरातील शेतकऱ्यांनी आमदार आशुतोष काळे यांचे आभार व्यक्त केले आहेत.तर आमदार आशुतोष काळे यांनी शेतकऱ्यांच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री ना.श्रीम. सुनेत्राताई पवार, उपमुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे, कृषी मंत्री ना. दत्तामामा भरणे, पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पा. यांचे आभार मानले आहे.




