छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबिर उत्साहात संपन्न

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबिर उत्साहात संपन्न
पोहेगाव व दहेगाव बोलका महसूल मंडळातील नागरिकांच्या अडचणींचा प्रशासनाकडून निपटारा

Kopargaon vijay kapse दि ११ मे २०२६–कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव व दहेगाव बोलका येथे भाजपा व महायुती सरकारच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबिराचे उद्घाटन कोपरगाव नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते यांच्या उपस्थितीत करण्यात आले. शिबिराच्या माध्यमातून पोहेगाव व दहेगाव बोलका येथील सर्वसामान्य नागरिकांच्या विविध महसुली अडचणींचा प्रशासनाकडून निपटारा करण्यात आला.

कोपरगाव तालुक्यातील दहेगाव बोलका तसेच पोहेगाव महसूल मंडळातील नागरिकांसाठी आयोजित करण्यात आलेले हे समाधान शिबिर सोमवारी सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत पार पडले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेत विविध समस्यांचे निराकरण करून घेतले. शासकीय व महसूल अधिकाऱ्यांनी नागरिकांना आवश्यक ती मदत व मार्गदर्शन केले.यावेळी आमदार विवेकभैय्या कोल्हे यांच्या लोकाभिमुख कार्याचा विशेष उल्लेख करण्यात आला. सर्वसामान्य नागरिकांच्या दारी शासकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील असल्याचे मान्यवरांनी सांगितले.

शिबिरामध्ये प्रलंबित फेरफार, सातबारा उताऱ्यातील चुका दुरुस्ती, डिजिटल स्वाक्षरीसह सातबारा व आठ-अ उताऱ्यांचे वाटप, उत्पन्न, रहिवासी व जातीचे दाखले, नॉन-क्रीमीलेअर प्रमाणपत्र, अकृषिक (एनए) परवानगी, सनद प्रक्रियेबाबत मार्गदर्शन, सामाजिक अर्थसहाय्य योजनांचे लाभ, विद्यार्थ्यांसाठी दाखले वाटप, तुकडेबंदी कायद्याच्या उल्लंघन प्रकरणांचा निपटारा, घरासाठी पट्टे वाटप, ई-मोजणी अर्ज, अॅग्रीस्टॅक व पीएम किसान नोंदणी आदी विविध सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या.तसेच भूसंपादन व अकृषिक परवानगी प्रकरणी कमी-जास्त पत्रके तयार करून गाव दप्तर अद्यावत करण्याची प्रक्रियाही राबविण्यात आली. या शिबिरामुळे नागरिकांच्या विविध शासकीय अडचणी गावपातळीवरच सोडविण्यात आल्या. त्यामुळे नागरिकांना वारंवार सरकारी कार्यालयात जाण्याची गरज भासणार नसून शासनाच्या सेवा अधिक सुलभ, पारदर्शक आणि प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचत असल्याची भावना उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली.

या प्रसंगी सहकार महर्षी शंकररावजी कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे संचालक ज्ञानदेव औताडे, संजय औताडे, बापूसाहेब औताडे, अशोक औताडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती नानासाहेब गव्हाणे, रमेश औताडे, विजय डांगे, माजी भाजपा तालुकाध्यक्ष विक्रम पाचोरे, कैलास रहाणे, शंकर औताडे, भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष मयूर कांडेकर, राजेंद्र औताडे, निखिल औताडे, कृष्णा औताडे, आप्पासाहेब औताडे, दत्तू शिंदे, बाळासाहेब पाचोरे, सुशील औताडे, नितीन चौधरी, पंकज जोंधळे, दत्तू गुंजाळ,दहेगाव बोलका महसूल मंडळाचे नायब तहसीलदार चंद्रशेखर कुलथे, मंडळ अधिकारी अनिल मांढरे, तलाठी अरुण माळवदे, तलाठी कृष्णा आरसेवार, तलाठी शिवनाथ थोरात, तलाठी विनोद ठेंगडे, तलाठी संतोष लाचुरे पुरवठा विभागगाच्या अधिकारी कुलकर्णी मॅडम, मंडळ कृषी अधिकारी साईनाथ मलिक, मंडळ उप कृषी अधिकारी संजय धनकुटे.रेशन दुकानदार संजय गवारे, त्रिंबकराव निवृत्ती सरोदे, विलास कुलकर्णी, पंढरीनाथ साळवे, अशोक चिमणाजी आभाळे, रामकृष्ण साळवे, बाळासाहेब देशमुख, किशोर बागल, निवृत्ती वलटे, रितेश वलटे, भारत चौधरी, शिवाजी ठाकरे, अशोकराव सुंबे, प्रकाश शिंदे, गोपीनाथ शिंदे, बबनराव निकम, किशोर सखारी साळुंखे, रवींद्र गायकवाड, संजय भवर, राजेंद्र खिल्लारी, कचरू भाटे, विष्णुपंत क्षीरसागर, बाळासाहेब सिनगर.तसेच पंचक्रोशीतील नागरिक,भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, लाभार्थी पुरुष व महिला बहुसंख्येने उपस्थित होते.



