आपला जिल्हा

विधान परिषदेच्या नवनियुक्त सदस्यांचा १४ मे रोजी शपथविधी होणार; युवा नेते विवेकभैय्या कोल्हे घेणार आमदारकीची शपथ

विधान परिषदेच्या नवनियुक्त सदस्यांचा १४ मे रोजी शपथविधी होणार; युवा नेते विवेकभैय्या कोल्हे घेणार आमदारकीची शपथ

विधान परिषदेच्या नवनियुक्त सदस्यांचा १४ मे रोजी शपथविधी होणार; युवा नेते विवेकभैय्या कोल्हे घेणार आमदारकीची शपथ

जाहिरात

Kopargaon vijay kapse दि १२ मे २०२६महाराष्ट्र राज्य विधान परिषदेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणूक प्रक्रियेत भारतीय जनता पार्टीकडून युवा, अभ्यासू आणि प्रभावी नेतृत्व म्हणून विवेक कोल्हे यांची विधान परिषद सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे कोपरगावसह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

जाहिरात

सर्व नवनियुक्त विधान परिषद सदस्यांचा शपथविधी सोहळा बुधवार दि. १४ मे रोजी सकाळी ११ वाजता मुंबई येथील विधान भवनात संपन्न होणार आहे. यावेळी विवेक कोल्हे हे विधान परिषद सदस्य म्हणून अधिकृतपणे शपथ घेणार आहेत. राज्याच्या राजकारणात युवा नेतृत्वाला संधी देण्याच्या दृष्टीने त्यांची निवड महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

जाहिरात

विवेक कोल्हे यांनी विविध सामाजिक, शैक्षणिक आणि जनहिताच्या प्रश्नांवर सातत्याने काम करत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या माध्यमातून विधान परिषदेत युवकांचे प्रश्न, ग्रामीण भागाचा विकास, शेती, शिक्षण आणि रोजगार यांसारख्या विषयांना प्रभावीपणे आवाज मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

जाहिरात

दरम्यान, या शपथविधी सोहळ्यासाठी कोल्हे समर्थकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र विधान परिषदेतील सर्व नवनियुक्त सदस्यांसह विवेक कोल्हे यांच्या शपथविधीकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे