आपला जिल्हा

सोमैया महाविद्यालयातील २० विद्यार्थ्यांची आय. टी. कंपनी मध्ये निवड

सोमैया महाविद्यालयातील २० विद्यार्थ्यांची आय. टी. कंपनी मध्ये निवड

सोमैया महाविद्यालयातील २० विद्यार्थ्यांची आय. टी. कंपनी मध्ये निवड

जाहिरात

Kopargaon vijay kapse दि १६ मे २०२६–के.जे. सोमैया वरिष्ठ व के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल अंतर्गत कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह चे आयोजन करण्यात आले होते. या ड्राईव्ह साठी मुंबई येथील लूमिव्हिक्टा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ने इंटरव्ह्यू द्वारे २० विद्यार्थ्यांची अंतिम निवड केली आहे,” अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. विजय ठाणगे यांनी दिली.

जाहिरात

या कॅम्पस ड्राईव्ह द्वारे बी.सी.एस., बी.बी. ए.- सी. ए., बी.सी. ए., एम.सी.एस., एम.कॉम. बी.कॉम इ. विभागातील विद्यार्थ्यांनी अभ्यासपूर्ण इंटरव्ह्यू च्या बळावर सॉफ्टवेअर डेव्हलपर आणि बिझनेस डेव्हलपमेंट असोसिएट या पदांवर आपले नाव कोरले असून या शैक्षणिक वर्षात आता पर्यंत एकूण चार ड्राईव्ह चे आयोजन करण्यात आले असून त्याद्वारे ३०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. एकूण २० कंपन्यांनी महाविद्यालयात येऊन विद्यार्थ्यांची निवड केली असल्याचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रो.डॉ. रवींद्र जाधव यांनी सांगितले.

जाहिरात

या ड्राईव्ह साठी लूमिव्हिक्टा कंपनी चे मॅनेजिंग डायरेक्टर यशोदिप शेटे, एच.आर. शैलेश अडकमोल, युवराज सिंग आणि वैष्णवी जाधव हे उपस्थित होते. याप्रसंगी संस्थेचे विश्वस्त  संदीप रोहमारे यांनी महाविद्यालयाच्या वतीने जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना नोकरी देण्याचा आमचा प्रयत्न असून त्यासाठी सुसज्ज अशी यंत्रणा महाविद्यालयात उभी केली असल्याचे सांगितले. यामध्ये ए.आय. आणि डेटा सायन्स लॅब, ट्रेनिंग प्रोग्रॅम्स, सुसज्ज लॅब, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन विभाग, आंतरराष्ट्रीय विद्यापीठाबरोबर सामंजस्य करार, यासह आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रीडा सुविधा व सर्व विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात शिष्यवृत्ती ची सुविधा उपलब्ध आहेत अशीही माहिती श्री. रोहमारे दिली.

जाहिरात

या ड्राईव्ह च्या यशस्वी आयोजनामध्ये आय. क्यू.ए.सी. समन्वयक प्रो.डॉ. गणेश शिंदे, रजिस्ट्रार डॉ. अभिजित नाईकवाडे, प्लेसमेंट ऑफिसर प्रा. विजय सोमासे, ट्रेनिंग ऑफिसर प्रा. नेहा गुरावे, प्रा. प्रवीण गुडघे, प्रा. सचिन जाधव, प्रा. विशाल जगधने, प्रा. निवृत्ती माळी, प्रा. ओमप्रकाश धनवटे यांनी विशेष परिश्रम घेतले. या ड्राईव्ह च्या माध्यमातून निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे तसेच यशस्वी आयोजनाबद्दल ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल’ चे प्रमुख व सर्व सदस्य प्राध्यापकांचे संस्थाध्यक्ष  अशोकराव रोहमारे व सचिव अॅड. संजीव कुलकर्णी यांनी विशेष अभिनंदन केले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे