आपला जिल्हा

निळवंडेचे आवर्तन सुरळीतपणे सुरु, सर्व पाझर तलाव, साठवण बंधारे भरून द्या; आमदार आशुतोष काळेंची पालकमंत्र्याकडे मागणी

निळवंडेचे आवर्तन सुरळीतपणे सुरु, सर्व पाझर तलाव, साठवण बंधारे भरून द्या; आमदार आशुतोष काळेंची पालकमंत्र्याकडे मागणी

निळवंडेचे आवर्तन सुरळीतपणे सुरु, सर्व पाझर तलाव, साठवण बंधारे भरून द्या; आमदार आशुतोष काळेंची पालकमंत्र्याकडे मागणी

जाहिरात

Kopargaon vijay kapse दि १६ मे २०२६ :- निळवंडे कालव्यांना आवर्तन सोडण्यात आले असून कोपरगाव तालुक्यात तळेगाव शाखा कालव्यातून वडझरी पॉइंट, बोडखेवाडी पॉइंट व शेख वस्ती पॉइंटमधून आवर्तन सुरळीतपणे सुरु आहे. त्यामुळे जिरायती भागातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. निळवंडेचे पाणी अंजनापूर गावापर्यंत पाणी आले आहे. वडझिर पॉइंट मधून डांगेवाडी बंधाऱ्यात पाणी सुरु आहे ते पुढे वेस, सोयगाव, बहादराबाद पर्यंत येणार आहे.त्यामुळे सुरु असलेल्या आवर्तनातून कोपरगाव मतदार संघातील सर्व पाझर तलाव, बंधारे, गावतळे भरून देण्याच्या सूचना पाटबंधारे विभागाला दयाव्यात अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी राज्याचे जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पा.यांच्याकडे टंचाई आढावा बैठकीत केली.

जाहिरात

जिल्हाधिकारी कार्यालयात राज्याचे जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पा.यांच्या अध्यक्षतेखाली टंचाई व मान्सूनपूर्व तयारी आढावा बैठक संपन्न झाली या बैठकीसाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील इतर लोकप्रतिनिधींबरोबरच आमदार आशुतोष काळे हे देखील दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

जाहिरात

यावेळी आमदार आशुतोष काळे यांनी सांगितले की, चालू वर्षी उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात असली तरी गोदावरी कालव्यांचे तसेच निळवंडेचे आवर्तन सुरु असल्यामुळे कोणत्याही प्रकारच्या अडचणी नाही. जिरायती भागातील नागरिकांना निळवंडे आवर्तनाचा मोठा लाभ झाला आहे. परंतु हवामान विभागाने चालू वर्षी पर्जन्यमान कमी होणार असल्याचा अंदाज वर्तवला असून पाऊस सुरु होण्यास अजून अवधी आहे.

जाहिरात

त्यामुळे सुरु असलेल्या निळवंडेच्या आवर्तनातून कोपरगाव मतदार संघाच्या जिरायती भागातील सर्व पाझर तलाव, बंधारे, गावतळे भरल्यास जोपर्यंत पाऊस पडत नाही तोपर्यंत अडचणी येणार नाहीत. त्यामुळे सुरु असलेल्या आवर्तनातून पाझर तलाव, बंधारे, गावतळे भरून देण्याच्या सूचना पाटबंधारे विभागाला दयाव्यात या आमदार आशुतोष काळे यांच्या मागणीला राज्याचे जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पा.यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी सांगितले आहे. त्यामुळे कोपरगाव मतदार संघाच्या जिरायती भागातील नागरीकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून त्यांनी आमदार आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे