आपला जिल्हा

शिष्यवृत्ती परीक्षेत ‘प्रवरा’चा डंका; पाचवी आणि आठवीचे ४९५ विद्यार्थी गुणवत्ता यादीत – डॉ.सुस्मिता विखे पाटील

शिष्यवृत्ती परीक्षेत ‘प्रवरा’चा डंका; पाचवी आणि आठवीचे ४९५ विद्यार्थी गुणवत्ता यादीत – डॉ.सुस्मिता विखे पाटील

शिष्यवृत्ती परीक्षेत ‘प्रवरा’चा डंका; पाचवी आणि आठवीचे ४९५ विद्यार्थी गुणवत्ता यादीत – डॉ.सुस्मिता विखे पाटील

जाहिरात

Loni vijay kapse दि १९ मे २०२६महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेने घवघवीत यश संपादन केले आहे. संस्थेच्या विविध शाखांमधील इयत्ता पाचवीच्या २४७ तर इयत्ता आठवीच्या २४८ विद्यार्थ्यांनी गुणवत्तेमध्ये स्थान मिळवून निकालाची परंपरा कायम राखली असल्याची माहिती संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील यांनी दिली.

जाहिरात

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक अभ्यासक्रमाबरोबरच स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या माध्यमातून दिली जाते. शालेय अभ्यासक्रमाच्या पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांमध्ये इतर शैक्षणिक परीक्षा देण्यासाठी प्रवृत्तही केले जाते. प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेने यासाठी विशेष विभाग कार्यरत केला असून, शिष्यवृत्ती परीक्षेमध्येही विद्यार्थ्यांची गुणवत्ता सिद्ध होण्यासाठी संस्थेच्या वतीने मार्गदर्शन केले जाते.

जाहिरात

२०२५-२६ या शैक्षणिक वर्षात शिष्यवृत्ती परीक्षेस बसलेल्या संस्थेतील इयत्ता पाचवीतील २४७ विद्यार्थ्यांनी गुणवत्तेमध्ये यश संपादन केले आहे. तसेच इयत्ता आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये २४८ विद्यार्थ्यांनी यश मिळवून संस्थेचा शैक्षणिक गुणवत्तेचा आलेख अधिक उंचावला असल्याचे डॉ. सुस्मिता विखे पाटील यांनी सांगितले. या परीक्षेतील यशामध्ये संस्थेचे शिक्षक, पालक यांचेही योगदान मोलाचे ठरले आहे.

जाहिरात

प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता स्पर्धात्मक वातावरणात घडविण्यावर भर देत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी कोणत्याही क्षेत्रात मागे राहू नये, यासाठी विविध स्पर्धा परीक्षा, शिष्यवृत्ती मार्गदर्शन, विशेष प्रशिक्षण वर्ग आणि अभ्यास उपक्रम राबविले जात आहेत. या प्रयत्नांमुळे संस्थेतील दहावी आणि बारावीच्या परीक्षेमध्येही चांगले यश संपादन केले आहे.

डॉ.सुस्मिता विखे पाटील

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेच्या माध्यमातून शैक्षणिक उत्साह निर्माण करण्याचा प्रयत्न संस्थेने सातत्याने केल्यामुळेच यंदाच्या वर्षी विद्यार्थ्यांनी मिळविलेले यश हे खूप अभिमानास्पद आहे. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, भाजप प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ आदींनी अभिनंदन केले आहे.

जाहिरात

“ग्रामीण भागातील विद्यार्थी कुठेही कमी नसतो; मात्र त्याला योग्य दिशा, मार्गदर्शन आणि संधी देण्याची आवश्यकता असते. हे कार्य प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेमार्फत सातत्याने केले जात आहे. प्रवरेच्या विद्यार्थ्यांनी दहावी-बारावीच्या परीक्षेमध्येही उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवली. शिष्यवृत्ती परीक्षेमध्येही विद्यार्थ्यांनी मिळविलेले यश इतर विद्यार्थ्यांना प्रेरणादायी असेच आहे.”

— ना. राधाकृष्ण विखे पाटील

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे