आपला जिल्हा

गौतम पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश प्रक्रिया सुविधा केंद्र सुरु

गौतम पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश प्रक्रिया सुविधा केंद्र सुरु

गौतम पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश प्रक्रिया सुविधा केंद्र सुरु

जाहिरात

Kopargaon vijay kapse दि २२ मे २०२६कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटी संचलित गौतम पॉलीटेक्निक इन्स्टिटयुटमध्ये शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी प्रथम वर्ष अभियांत्रिकी पदविका प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली असून तंत्रशिक्षण संचालनालय मार्फत गौतम पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट, गौतमनगर (FC CODE-5417) महाविद्यालयामध्ये बुधवार दि. २० पासून प्रवेश प्रक्रिया सुविधा केंद्र सुरु झाले असल्याची माहिती प्राचार्य वसीम शेख यांनी दिली आहे.

जाहिरात

महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षणालयाच्या संकेत स्थळावर प्रवेश घेवू इच्छिणा-या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे गरजेचे आहे. प्रवेशासाठी आवश्यक असणा-या आपल्या कागद पत्रांची पडताळणी भरलेल्या माहितीत सुधार करणे आणि ऑनलाईन फॉर्म निश्चिती करणे गरजेचे आहे. या केंद्रातून संस्था व शाखा निवड, विकल्प, अर्ज भरणे प्रवेशाच्या फे-या व प्रवेश घेवू इच्छिणा-या विद्यार्थ्याला हवे असलेले शैक्षणिक संकुल व हवी असलेली शाखा मिळावी यासाठी नवीन नियमावलीनुसार विकल्प अर्जातील विविध पर्यायावरील पसंती आदी बाबींची विद्यार्थ्यांना महत्वपूर्ण माहिती दिली जाणार आहे.

जाहिरात

महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण संचालनालय मुंबई, यांच्याकडून दहावीनंतरच्या अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेस सुरुवात करण्यात आली आहे. २० मे पासून विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया करावी लागणार आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेत अडचणी येऊ नये यासाठी गौतम पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट गौतमनगर (कोळपेवाडी) येथे प्रवेश प्रक्रिया सुविधा केंद्र नियुक्त केले आहे. विद्यार्थ्यांनी या सुविधेचा लाभ घेऊन प्रवेश प्रक्रियेतील येणाऱ्या अडचणी व शंका या सुविधा केंद्रास भेट देऊन दूर कराव्यात असे आवाहन प्राचार्य वसीम शेख यांनी केले आहे.

जाहिरात
कॉलेज

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे