आपला जिल्हा

माझे अन आशाताईंचे वेगळेच नाते;  दुर्गाताई तांबे यांनी जागवल्या आठवणी

माझे अन आशाताईंचे वेगळेच नाते;  दुर्गाताई तांबे यांनी जागवल्या आठवणी

माझे अन आशाताईंचे वेगळेच नाते;  दुर्गाताई तांबे यांनी जागवल्या आठवणी

जाहिरात

Sangmner vijay kapse दि १५ एप्रिल २०२६संगमनेरला  माझे वडील सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांची जयंती दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरी करतो. 2014 साली जयंती महोत्सवाच्या कार्यक्रमास गाणंसम्राज्ञी स्व. आशाताई भोसले यांचा लाईव्ह कॉन्सर्ट कार्यक्रम ठेवण्यात आला होता. यावेळी माझ्या ओवी या पुस्तकाच्या सहाव्या आवृत्तीच्या प्रकाशनात मी आशाताई भोसले यांचा अभिप्राय घेतला.

जाहिरात

       आशा भोसले व गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या बद्दल मला पहिल्यापासून खूप आदर आणि प्रेम होते. आशाताई मध्ये  अन माझ्यात दिसण्यात सारखेपणा होता. चेहऱ्याची ठेवण सारखीच होती व साड्यांचा प्रकार, नेसण्याची पद्धत, पदराची पद्धत बऱ्यापैकी सारखीच असल्याने आम्हा दोघीत बऱ्याच लोकांना साम्य वाटायचे.

जाहिरात

       वेगळ्या गावात गेल्यावर कुणीतरी विचारायचेच तुम्ही आशाताई भोसले यांच्या कोण आहे? या नेहमी विचारल्या जाणाऱ्या प्रश्नामुळे त्या माझ्या मावस बहीण आहे असे मी सांगायचे.

     एकदा अभिनेत्री शबाना आझमी जयंती महोत्सव निमित्त संगमनेरला कार्यक्रमास आल्या. आणि मला पाहता क्षणी ओरडल्या ओहो सेम आशाताई…. त्यांना सुद्धा माझ्यात आशाताई दिसल्या.

       खरंतर त्या माझ्यापेक्षा वयाने ज्येष्ठ होत्या पण भारताच्या गान कोकिळा होत्या. स्व. लता मंगेशकर यांच्या बहीण होत्या. वृद्धपकाळामुळे त्या आपल्यातून गेल्या पण त्यांचे विविध भाषांमधील आणि विशेषता मराठी मधील गाणे, आवाज आणि आठवणी आपण कधीही विसरू शकत नाही.

     त्यांच्या स्मृतीस अभिवादन… दुर्गा सुधीर तांबे
मा. नगराध्यक्ष
संगमनेर नगरपालिका

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे