शिर्डीत शिवसेना अहिल्यानगर जिल्हा पदाधिकारी आणि कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन

शिर्डीत शिवसेना अहिल्यानगर जिल्हा पदाधिकारी आणि कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन
शिर्डीत शिवसेना अहिल्यानगर जिल्हा पदाधिकारी आणि कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन

Kopargaon vijay kapse दि ३० मे २०२६-: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा भव्य मेळाव्याचे आयोजन दिनांक २ जून २०२६ रोजी दुपारी १ वाजता शिर्डी येथे साई किमया गार्डन एअर पोर्ट रोड शिर्डी येथे करण्यात आले असल्याची माहिती शिवसेना अहिल्यानगर यांच्या वतीने देण्यात आली आहे. या मेळाव्यासाठी शिवसेनेची बुलंद तोफ खासदार संजय राऊत हे प्रमुख उपस्थित राहणार असून सध्याच्या अस्थिर राजकीय वातावरणामध्ये संजय राऊत यांचे मोलाचे मार्गदर्शन कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना मिळणार आहे.

याच सोबत शिवसेनेचे जेष्ठ नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे, विधानपरिषदेचे माजी विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे, अहिल्यानगर जिल्हा संपर्क प्रमुख आमदार सुनील शिंदे , खासदार भाऊसाहेब वाकचौरे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेतl. या मेळाव्यासाठी सर्व शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा प्रमुख सचिन कोते, जगदीश चौधरी, राजेंद्र दळवी तसेच सर्व उपजिल्हाप्रमुख,तालुका प्रमुख शहरप्रमुख ,युवासेना, महिला आघाडी आणि पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या वतीने करण्यात आले आहे.

तसेच कोपरगाव शिवसेना तालुकाप्रमुख भरत मोरे यांनी कोपरगाव तालुक्यातील शेतकरी राजाला या सभेला येण्यासाठी विनंती केली आहे,कारण महायुतीच्या काळात शेतकरी देशोधडीला लागला, आत्महत्या करतो आहे,. म्हणून या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी सगळ्यांनी या शिवसेनेच्या मेळाव्याला यावं असे जाहीर आवाहन केले आहे.





