ठाकरे सेनेच्या वतीने तुळशीचे रोपवाटप करत पर्यावरण दिन साजरा
शहर प्रमुख गगन हाडा यांच्या संकल्पनेतून अनोखा उपक्रम
जाहिरात
Kopargaon vijay kapse दि ५ जुन २०२६ – जागतिक पर्यावरण दिन शासनासह विविध सामाजिक संस्था वेगवेगळे उपक्रम राबवत साजरा करत असते याच दिनाचे औचित्य साधत उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या वतीने कोपरगाव शहर शिवसेनेचे शहर प्रमुख गगन हाडा यांच्या नेतृत्वाखाली शहरातील एस.एस.जी.एम व के.जे सोमैय्या महाविद्यालयात ज्ञानदानाचे महत्त्वाचे कार्य करत असणाऱ्या सर्व प्राध्यापकांना हिंदू धर्मात अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या व २४ तास ऑक्सिजन देणाऱ्या तुळशीच्या रोपाचे वाटप करत अनोख्या पद्धतीने पर्यावरण दिन साजरा करत पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.
जाहिरात
शुक्रवारी ५ जून रोजी शिवसेना कोपरगाव शहर गगन हाडा यांच्या नेतृत्वाखाली युवासेनेचे निखिल क्रंकाळे, ऋषी खैरनार, वैभव शेलार, कान्हा हाडा, विनय टाक, आबासाहेब पवार, याकूब शेख, गणेश वहाडणे, ओम् सुरळकर, शंतनू चावरिया, वरुण टाक, रिहान शेख, राहुल लख्खन आदी शिवसैनिक युवासैनिकानी प्राचार्य डॉ विजय ठाणगे,प्राचार्य डॉ माधव सरोदे यांच्या सह सर्व प्राध्यापकांना तुळशीचे रोपे वाटप करत अनोखा उपक्रम राबविला.जाहिरात
याप्रसंगी गगन हाडा यांनी उपस्थित प्राचार्य प्राध्यापक व विद्यार्थी यांच्याशी संवाद साधताना सांगितले की, सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे उद्योग व्यवसाय व विकासाच्या नावाखाली काँक्रिटीकरण करत हजारो वर्ष पूर्वीची अमूल्य वृक्षांची बेसुमार वृक्ष तोड होत असल्याने खंत व्यक्त करत सरकार फक्त पर्यावरण दिनापुरते कागदावरच वृक्ष लागवड करत आहे पण प्रत्यक्षात डोंगर जंगले माळरान झाल्याची पहावयास मिळत आहे आणि यातून सर्वच भागातील उष्णता ४५ डिग्री च्या पुढे जात असल्याने पावसाचे प्रमाण देखील कमी होत चालले आहे त्यामुळे शासनासोबत उद्याच्या भारताचे भविष्य असलेल्या युवकांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत फक्त वृक्षारोपण फोटो पुरतं अथवा कागदपत्रा पुरत न करता त्या लावलेल्या वृक्षाचे जतन करावे जेणेकरून आपली येणारी पिढी देखील सुखाने जीवन जगेल आणि या कामी प्राध्यापकांनी अभ्यासासोबत सर्वच विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व सांगत. प्रत्येक विद्यार्थ्याने देशी वृक्षाची लागवड करत त्याचे जतन करण्यासाठी मार्गदर्शन करत त्याच्या प्रात्यक्षिक परीक्षेत अथवा अवांतर अभ्यासात याचा समावेश करून घ्यावा. जेणेकरून विद्यार्थी देखील निसर्ग वाढीसाठी प्रयत्न करतील असा विश्वास या प्रसंगी गगन हाडा यांनी व्यक्त केला.जाहिरात