आपला जिल्हा

कर्मवीर शंकरराव काळे कारखाना मिल रोलर पूजन उत्साहात संपन्न         

कर्मवीर शंकरराव काळे कारखाना मिल रोलर पूजन उत्साहात संपन्न        

कर्मवीर शंकरराव काळे कारखाना मिल रोलर पूजन उत्साहात संपन्न         

जाहिरात

Kopargaon vijay kapse दि १६ जुन २०२६ :- कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या २०२६-२७ च्या ७२ व्या गळीत हंगामाची तयारी करण्याच्या दृष्टीने मिल रोलर पूजन कारखान्याचे ज्येष्ठ संचालक व मार्गदर्शक माजी आमदार अशोकराव काळे व कारखान्याचे चेअरमन आ.आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याचे संचालक सचिन चांदगुडे यांच्या हस्ते मंगळवार (दि.१६) रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाले.

जाहिरात

मिल रोलर पूजनाने कारखान्याच्या ७२ व्या गळीत हंगामाची तयारी सुरु झालेली आहे. येणाऱ्या गळीत हंगामाची पूर्व तयारी म्हणून दरवर्षी करण्यात येणारे मिल रोलर पूजन संपन्न झाले असून संपूर्ण कारखान्याचे नूतनीकरणाचे काम मागील वर्षी पूर्ण झालेले आहेत. त्यामुळे अडचणी बहुतांश प्रमाणात कमी झाल्या आहेत. तरी देखील दरवर्षी प्रमाणे कारखान्याच्या यंत्र सामुग्रीचे देखभाल दुरुस्तीची कामे वेळेत पूर्ण करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. मिल रोलर पूजनाने कारखाना सुरु होण्याचा संदेश मिळतो.त्यामुळे छोट्या मोठ्या व्यावसायिकांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण होवून अर्थकारणाला गती मिळण्याचा हा एक प्रकारचा संदेश असल्यामुळे कारखान्याच्या मिल रोलर पूजनाला विशेष महत्व आहे. तसेच गळीत हंगामाच्या दृष्टीने ऊस तोडणी व वाहतूक यंत्रणा भरती अॅडव्हान्स वाटप सुरु करण्यात आले असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी सांगितले आहे.

जाहिरात

चालू वर्षी मान्सूनवर एलनिनोचे सावट असल्यामुळे अर्धा जून महिना होवूनही पावसाचा कुठेही मागमूस नसल्यामुळे पेरण्या खोळंबल्या आहेत. संभाव्य पाणी टंचाई ओळखून शिल्लक पाण्याचा काटेकोरपणे वापर करण्यासाठी सुरु असलेल्या सिंचनाच्या आवर्तनाला स्थगिती देण्यात आली असून ऊस शेती धोक्यात आली आहे. जरी काहीशी चिंताजनक परिस्थिती असली तरी शेतकऱ्यांनी सिंचनासाठी पाणी जपून वापरावे.दुष्काळी परिस्थिती पाहता शेतकऱ्यांनी अवाढव्य खर्च करू नये व पुरेसा पाऊस पडल्याशिवाय पेरण्या करू नये. शासनाकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन आ. आशुतोष काळे यांनी केले आहे.

जाहिरात

याप्रसंगी कारखान्याचे व्हा.चेअरमन प्रवीण शिंदेसंचालक दिलीपराव बोरनारेसूर्यभान कोळपेसुधाकर रोहोमराजेंद्र घुमरेसचिन चांदगुडेश्रीराम राजेभोसलेराहुल रोहमारेशंकरराव चव्हाणअनिल कदमअशोक मवाळसुनील मांजरेप्रशांत घुले, मनोज जगझाप, वसंतराव आभाळे,डॉ.मच्छिंद्र बर्डेदिनार कुदळेश्रावण आसनेगंगाधर औताडेसुरेश जाधवविष्णू शिंदेकार्यकारी संचालक सोमनाथ बोरनारेजनरल मॅनेजर सुनील कोल्हेआसवनी विभागाचे जनरल मॅनेजर ज्ञानेश्वर आभाळेसेक्रेटरी बाबा सय्यदअसि. सेक्रेटरी संदीप शिरसाठचीफ इंजिनिअर निवृत्ती गांगुर्डेचीफ केमिस्ट सुर्यकांत ताकवणे तसेच विविध खात्यांचे प्रमुख पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते

           

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे