आपला जिल्हा

महाराणा प्रतापसिंह जयंती व राजमाता जिजाऊ माँसाहेब पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

महाराणा प्रतापसिंह जयंती व राजमाता जिजाऊ माँसाहेब पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

महाराणा प्रतापसिंह जयंती व राजमाता जिजाऊ माँसाहेब पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

जाहिरात

Kopargaon vijay kapse दि १७ जुन २०२६: श्री सद्गुरु गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स, संजीवनी कॉमर्स महाविद्यालयात हिंदवी स्वराज्याचे प्रेरणास्थान महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त तसेच राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

जाहिरात

यावेळी महाराणा प्रतापसिंह व राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या प्रतिमांचे पूजन करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमास महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन ॲड. संदीप वर्पे, सदस्य महेंद्रशेठ काळे, सुनील गंगुले, बाळासाहेब आव्हाड, प्राचार्य डॉ. माधव सरोदे, सर्व उपप्राचार्य, विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात

यावेळी उपस्थितांनी महाराणा प्रतापसिंह यांच्या शौर्य, स्वाभिमान व राष्ट्रनिष्ठेच्या कार्याचा तसेच राजमाता जिजाऊ माँसाहेब यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना दिलेल्या संस्कारांचे स्मरण करून त्यांच्या कार्याला अभिवादन केले. कार्यक्रम शांत व प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.

जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे